New Year celebrations Arambol Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach Crowd: 5 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास! ‘थर्टी फर्स्ट’मुळे हरमलमध्ये वाहतूक कोंडी

Arambol Tourists: हरमल बीच रोडवरील सततची वर्दळ पाहता,किमान सहा ठिकाणी पोलीस वाहतूक नियंत्रकाची नितांत गरज असल्याचे मत वाहन चालक अनिरुद्ध हरमलकर यांनी व्यक्त केले.

Sameer Panditrao

Traffic issues due to New Year celebrations in Arambol

हरमल: नव वर्ष स्वागत अर्थात ‘थर्टी फर्स्ट’साठी हरमल किनारी भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. ही पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या चार दिवसांत पोलिसांनी चलन व अन्य प्रकारांकडे अधिक लक्ष न देता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी हरमलवासीयांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत आमदार जीत आरोलकर यांनाही वाहतूक कोंडीबाबतची तक्रार हरमलवासीयांनी ऐकवली. त्यावर त्यांनी वाहतूक कोंडीवर आवश्यक पावले उचलण्यासंबंधी पोलिसांना खास सूचना दिल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

गेले चार दिवस पर्यटन प्रसिद्ध हरमल बीच तसेच रिव्हा रिसॉर्ट पासून थेट तिठा भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्याचे कित्येक वाहन चालकांनी संतापयुक्त सुरात सांगितले.

हरमल बीच रोडवरील सततची वर्दळ पाहता,किमान सहा ठिकाणी पोलीस वाहतूक नियंत्रकाची नितांत गरज असल्याचे मत वाहन चालक अनिरुद्ध हरमलकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ यांनी नियम मोडणाऱ्यांत दरारा निर्माण केल्याचे दिसून येते, त्यामुळे वसुली व चलन बाबत मवाळ भूमिका घेऊन नववर्ष साजरे करणाऱ्या पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पोलिस तैनात करा!

फुटबॉल मैदान, बेकरी, किनारा हॉटेल, ओम गणेश सुपर मार्केट, प्रवीण वायंगणकर निवासस्थान, फामापा हॉटेल तसेच तिठा व मासळी मार्केट भागातील चार दिवसांतील वाहतूक कोंडी पाहता, किमान आजपासून पाच दिवस वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी,अशी मागणी अनिरुद्ध हरमलकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी वाहतूक विभागाचे विश्वजित चोडणकर यांनी खास फौजफाटा तैनात केला होता, यंदाही तशी कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.

५ मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास!

वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्थानिक ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असतात. त्यांना पाच मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा- पाऊण तास लागतो. हे अतिशय कष्टप्रद असल्याने, ख्रिस्ती बांधवाची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा पोलिस निरीक्षक शेरीफ व चोडणकर यांनी संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT