Goa New Voters  Dainik Gomantak
गोवा

नवमतदारांकडून 'गोवा हेरिटेज' संबंधी प्रश्न ऐरणीवर

आपापल्या मतदारसंघात नेता निवडताना नवमतदारांची मते ठाम

दैनिक गोमन्तक

पणजी: तिसर्‍या कोविड-19 लाटेने शिक्षणाला व्हर्च्युअल मोडमध्ये ढकलले आहे. त्यातच समोर येऊन ठेपलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी तणावग्रस्त होत आहेत. असे असूनही आपापल्या मतदारसंघात नेता निवडताना त्यांची मते ठाम आहेत. गोव्यातील काही गावांमध्ये अजूनही योग्य रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा नसताना देखील, आमच्याकडे स्टार्टअप्स आणि उद्योगांचे आश्वासन देणारे उमेदवार समोर येत आहेत. ग्रामीण महिलांना बचत गटांद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी, तसेच शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला एका नेत्याची गरज आहे,” असे मत एका विद्यार्थिनीने मांडले (new voters raises question pertaining to goa heritage)

सोमवारी 11.6 लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार गोव्याचे (Goa) पुढील सरकार निवडण्यासाठी बाहेर पडतील, त्यापैकी 29,479 मतदार हे 18-19 वयोगटातील प्रथमच मतदार आहेत. या तरुण मतदारांना राज्यातील नवीन लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत, याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले .

“आम्हाला दळणवळण, वैद्यकीय सुविधा, कचरा प्रक्रिया, नियमित वीजपुरवठा, शिक्षण आणि पिण्याचे पाणी यासाठी चांगल्या सुविधांची गरज आहे. प्रत्येक पक्षाने केलेले जाहीरनामे आकर्षक आहेत, परंतु केवळ आश्वासने देणारे नाहीत तर आश्वासने पाळणारे कोणीतरी हवे. तो उमेदवार पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखण्यास सक्षम असले पाहिजेत,” असे मत एक विद्यार्थ्याने मांडले.

गोवा हेरिटेज साइटशी समस्ये संबंधी विद्यार्थ्यांना आत्मियता

या वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोले आणि जुने गोवा हेरिटेज (Goa Heritage) साइटशी संबंधित समस्यांबद्दल तसेच, पर्यावरण आणि वारसा जागरुकतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आपले मत मांडले. “सर्व पक्षांनी गोव्याचा सामाजिक-पर्यावरणीय विनाश घडवून आणला आहे, राज्यातील राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा पळविला जात आहे, तसेच चांगल्या पर्यावरणीय धोरणांची अंमलबजावणी होत नाही. मागील काही वर्षांत राज्यात फक्त एमजीपी, भाजप आणि काँग्रेस निवडणूक लढवत होते. मात्र यावेळी, गोवा राज्यात दिल्ली आणि बंगालमधूनही पक्ष आज गोव्यात निवडणूक (Goa Assembly Election) लढवत आहेत. GFP आणि RGP सारखे स्थानिक पक्ष, तसेच अपक्ष उमेदवारांव्यतिरिक्त, मोठ्या पक्षाच्या तिकिटांवर निवडणूक लढविणाऱ्यांपैकी काहींना कडवी टक्कर देण्याची शक्यता आहे. टीएमसी आणि आप या पक्षांच्या दिमाखदार प्रवेशामुळे यावेळची निवडणूक अतिशय उत्कट ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT