New Voters Dainik Gomantak
गोवा

New voters Opinion : राजकारणात सक्षम, निष्ठावंतांची गरज!

निवडणूक आयोगातर्फे आज होणार ओळखपत्रे वितरित

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान हा होय. हा अधिकार सर्वांना प्राप्त होऊन देशात लोकशाहीमार्गाने सुशासन प्राप्त व्हावे, यासाठी भारतीय घटनेनुसार वयाच्या 18 वर्षानंतर मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाची Election Commission of India स्थापना याच दिवशी करण्यात आली आहे. (New voters need loyalists in the forthcoming Assembly elections)

25 जानेवारीला देशभरात नवमतदारांना New Voters ओळखपत्रे वितरित करण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे राबविला जाणार आहे. प्रत्येक मतदाराचे कर्तव्य काय, त्यांना मिळालेल्या या अधिकाराचा योग्य वापर व जागरुकता हा राष्ट्रीय मतदार दिनाचा National Voters Day मुख्य उद्देश आहे. या दिनाविषयी राज्यातील युवकांकडून दै. ‘गोमन्तक’ने जाणून घेतलेल्या अपेक्षा व प्रश्न आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया स्वरुपात देत आहोत.

शुभम भुस्कुटे, द्वितीय वर्ष - सरकारी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, साखळी

भारताचा जबाबदार नागरिक या नात्याने निवडणुकीत योग्य उमेदवारालाच मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे. आजकाल तरुण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु युवकांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवार निवडला तरच देशाची लोकशाही अखंडित राहणार आहे. भारतातील युवक हा देशाचा पाया आहे. त्यामुळे हा पाया घट्ट होण्यासाठी निवडणुकीत सजग लाहून आपले कर्तव्य व अधिकार याची जाणीव ठेवून मतदान करून देशहिताचे कार्य करायला हवे.

- अनिल भिंगी पीईएस रवी नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालय, फर्मागुढी.

गोव्याबरोबरच इतर राज्यात मिळून एकूण पाच ठिकाणी विधानसभा निवडणुका होत आहेत. जातीच्या व धर्माच्या राजकारण करून कुणी निवडणूक लढवू पाहत असेल, तर ते देशासाठी घातक आहे. भारतीय राज्यघटनेने मतदानाचा दिलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, वाद या सर्वांना बगल देऊन आम्ही भारतीय याचा विचार करून मतदान करणे गरजेचे आहे. राज्यात व देशात निवडणूक प्रक्रियेतून योग्य लोकप्रतिनिधी सत्तेवर आल्यास देशाची व राज्याची सुरक्षितता टिकून राहणार आहे. असे होण्यासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा.

- राशी देसाई, गोवा औषध निर्माण महाविद्यालय, पणजी

राष्ट्रीय मतदार दिन हा युवकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवमतदारांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. हा अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्टातून निर्माण केलेल्या राज्यघटनेद्वारे प्रत्येक भारतीयास मिळालेला आहे, याची जाणीव नवमतदारांनी ठेवणे गरजेचे आहे. देशहिताचा विचार करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरते. म्हणून मतदानाचा अधिकार बजावताना सक्षम व निष्ठावंत लोकप्रतिनिधी राजकारणात येणे गरजेचे आहेत. देशाचे भविष्य उज्वल बनण्यासाठी अशा उमेदवारांचीच योग्य निवड करणे प्रत्येक युवकांच्या हाती आहे.

- ऋणाल गावकर आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईन

देशाच्या प्रगतीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यासाठी युवकांचा पुढाकार हाही तितकाच महत्त्वाचा आहे. भारत देश सर्व पातळीवर यशस्वी व मजबूत होण्यासाठी निवडणुकीत चांगले उमेदवार निवडून येणे गरजेचे आहेत. आम्ही युवकांनी केवळ एका उमेदवाराचा विचार न करता देशहिताचा विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. युवकांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला तरच चांगले व भ्रष्टाचारमुक्त सरकार घडू शकते. देशातील किंबहुना राज्यातील प्रत्येकाचा विचार करणारे सरकार सत्तेवर आले तरच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे.

रिया नाईक, शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालय कुडचडे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पडण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे. नवमतदारांना जरी 25 जानेवारीला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असला तरी ही जबाबदारी केवळ नवमतदारांवरच येऊन थांबते असे नव्हे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार योग्यप्रकारे बजावला तर चांगले लोक राजकारणात येतील. भ्रष्टाचार, बनवेगिरी या गोष्टी हद्दपार होण्यासाठी भारतीय राज्य घटनेमुळे मिळालेला हा अधिकार सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. तरच सर्वांसाठी चांगले सरकार अनुभवता येईल आणि हे प्रत्येकाच्या हातात आहे.

गंगाराम आवणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT