Vande Bharat Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat: बेंगळुरू–गोवादरम्यान नवी वंदे भारत एक्स्प्रेस; रेल्वे मंडळाची मंजुरी, 13 तास 20 मिनिटांत प्रवास

Bengaluru Goa Vande Bharat Express: गोवा आणि कर्नाटक यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने यशवंतपूर (बेंगळुरू) ते मडगावदरम्यान नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा आणि कर्नाटक यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने यशवंतपूर (बेंगळुरू) ते मडगावदरम्यान नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. ही गाडी मंगळूर जंक्शनमार्गे धावणार असून, यशवंतपूर ते मडगाव हे अंतर सुमारे १३ तास २० मिनिटांत पूर्ण करणार आहे.

या नव्या रेल्वेसेवेमुळे बेंगळुरू, हासन, सकलेशपूर, मंगळूर, उडुपी, कारवार आणि गोवा यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः कर्नाटकच्या किनारपट्टीवरील प्रवाशांना तसेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या सेवेचा लाभ होणार आहे.रेल्वे मंडळाने या गाडीला २६६५५ आणि २६६५६ असे क्रमांक दिले आहेत. यशवंतपूर-मडगाव गाडीचा क्रमांक २६६५५, तर मडगाव-यशवंतपूर परतीच्या गाडीचा क्रमांक २६६५६ असेल.

सकाळी यशवंतपूरहून प्रस्थान

यशवंतपूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ७.३५ वाजता यशवंतपूर येथून सुटेल. श्रवणबेळगोळ येथे सकाळी ९.०३ वाजता, हासन येथे ९.३८ वाजता आणि सकलेशपूर येथे १०.२० वाजता पोहोचेल. त्यानंतर सुब्रह्मण्य रोड येथे दुपारी १२.४० वाजता, कबाका पुत्तूर येथे १.२५ वाजता आणि मंगळूर जंक्शन येथे दुपारी ३.०५ वाजता पोहोचेल. मंगळूर येथे दहा मिनिटांचा थांबा असेल.

उडुपी येथे सायंकाळी ४.२० वाजता, कुंदापूर येथे ४.३८ वाजता, मुकांबिका रोड बायंदूर येथे ५.२० वाजता, मुरुडेश्वर येथे ६ वाजता, गोकर्ण रोड येथे ७ वाजता आणि कारवार येथे ७.४५ वाजता गाडी पोहोचेल. रात्री ८.५५ वाजता मडगाव स्थानकावर तिचे आगमन होईल.

बुधवारी, गुरुवारी नाही

ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यशवंतपूरहून मडगावकडे जाणारी गाडी दर बुधवारी धावणार नाही, तर मडगावहून यशवंतपूरकडे जाणारी गाडी दर गुरुवारी धावणार नाही.

या सेवेसाठी दोन वंदे भारत गाड्यांचे संच उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यशवंतपूर येथे गाड्यांची प्राथमिक देखभाल केली जाणार असून, मंगळूर जंक्शन येथे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही गाडी बीईएमएलने चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केली आहे.

मडगाव-मंगळूर सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस बंद

दरम्यान, सध्या धावणारी मडगाव-मंगळूर सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस (२०६४५/२०६४६) बंद करण्याचाही निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. नव्या यशवंतपूर-मडगाव सेवेमुळे या गाडीची जागा घेतली जाणार आहे. नव्या सेवेच्या प्रत्यक्ष प्रारंभाची तारीख आणि तिकीट दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

१२ स्थानकांवर थांबे

नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला यशवंतपूर ते मडगाव या प्रवासादरम्यान १२ मध्यवर्ती स्थानकांवर थांबे असतील. त्यामध्ये श्रवणबेळगोळ, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, कबाका पुत्तूर, मंगळूर जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बायंदूर, मुरुडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार या स्थानकांचा समावेश आहे.

या मार्गामुळे गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या धार्मिक, पर्यटन आणि व्यापारी केंद्रांना थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. जाणाऱ्या भाविकांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

यशवंतपूर–मडगाव वंदे भारतचे वेळापत्रक

तपशील वेळ / माहिती

गाडी क्रमांक २६६५५

यशवंतपूरहून प्रस्थान सकाळी ७.३५

मडगावला आगमन रात्री ८.५५

प्रवासाचा कालावधी १३ तास २० मिनिटे

साप्ताहिक सुटी बुधवार

परतीच्या गाडीचा क्रमांक २६६५६

मडगावहून प्रस्थान सकाळी ८.२०

यशवंतपूरला आगमन रात्री ९.१५

साप्ताहिक सुटी गुरुवार

मध्यवर्ती थांबे १२

मडगावहून सकाळी ८.२० वाजता सुटणार

परतीच्या प्रवासात मडगाव-यशवंतपूर वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ८.२० वाजता मडगावहून सुटेल. कारवार येथे सकाळी ९.०३ वाजता, गोकर्ण रोड येथे ९.४८ वाजता, मुरुडेश्वर येथे ११ वाजता आणि मुकांबिका रोड बायंदूर येथे ११.२० वाजता पोहोचेल.

कुंदापूर येथे सकाळी ११.४८ वाजता, उडुपी येथे दुपारी १२.१८ वाजता आणि मंगळूर जंक्शन येथे दुपारी १.५० वाजता गाडी पोहोचेल. त्यानंतर कबाका पुत्तूर, सुब्रह्मण्य रोड, सकलेशपूर, हासन आणि श्रवणबेळगोळ येथे थांबे घेत रात्री ९.१५ वाजता यशवंतपूर येथे पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan LPG Crisis: पाकिस्तानात महागाईचा महा-विस्फोट! 12 किलोचा गॅस सिलेंडर 7000 रुपयांवर; लोकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत

Konkani Language: सीमा वेगळ्या, पण भाषा-संस्कृती एकच; कोकणीमुळे गोवा-कर्नाटक जोडले – मुख्यमंत्री सावंत

Goa LPG Project: मुरगाव बंदरात 5 हजार कोटींचे एलपीजी टर्मिनल; 2,450 रोजगार, 80 टक्के पदे गोमंतकीयांसाठी

Goa Land Scam: भूखंड गैरव्यवहारात सावईकरना झटका, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पत्नीला सशर्त जामीन

"अधिकाऱ्यांना लाभ, मग कर्मचाऱ्यांचा DA का रोखला?", उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल; मुख्य सचिवाला ठोठावला लाखोंचा दंड

SCROLL FOR NEXT