Konkani Language: सीमा वेगळ्या, पण भाषा-संस्कृती एकच; कोकणीमुळे गोवा-कर्नाटक जोडले – मुख्यमंत्री सावंत

Global Konkani Music Convention: गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमा वेगळ्या असल्या, तरी दोन्ही प्रदेशांची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि प्रामुख्याने कोकणी भाषा एकसमान आहे.
Global Konkani Music Convention
Konkani LanguageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमा वेगळ्या असल्या, तरी दोन्ही प्रदेशांची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि प्रामुख्याने कोकणी भाषा एकसमान आहे. कोकणी भाषा ही दोन्ही प्रदेशांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळुरू येथे मांड सोभान या संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक कोकणी संगीत महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मायकल लोबो, दिलायला लोबो, मांड सोभानचे अध्यक्ष लुई जे. पिंटो, डॉ. रोनाल्ड कुलासो आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Global Konkani Music Convention
Goa LPG Project: मुरगाव बंदरात 5 हजार कोटींचे एलपीजी टर्मिनल; 2,450 रोजगार, 80 टक्के पदे गोमंतकीयांसाठी

मंगळुरू येथे आयोजित हे महासंमेलन सलग १२ दिवस, १२ तास आणि १२ मिनिटे चालणार आहे. या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन कोकणी संगीताचा जागतिक विक्रम प्रस्थापित होणार आहे. हा उपक्रम जगभरातील कोकणी भाषिकांसाठी अभिमानाची बाब असून, त्याला माझ्या शुभेच्छा असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

गोव्यात कोकणीला राजभाषेचा दर्जा असून साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सरकारचे सहकार्य लाभते. मात्र, मंगळुरू येथे कोकणी भाषेला तुलनेने कमी राजाश्रय मिळत असतानाही तेथील लोकांनी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. भाषेच्या विकासासाठी उभारलेल्या सुविधा आणि राबविण्यात येणारे उपक्रम यांची दखल घेऊन त्यातून शिकण्याची गरज आहे. पूर्वजांनी जतन केलेली भाषा टिकविणे तसेच तिच्या वृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Global Konkani Music Convention
Goa Land Scam: भूखंड गैरव्यवहारात सावईकरना झटका, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पत्नीला सशर्त जामीन

विश्‍वविक्रमी कार्यक्रम

या विश्‍वविक्रमी संगीत कार्यक्रमात ३०० हून अधिक संघांतील ६,७८९ पेक्षा जास्त गायकांनी भाग घेणार आहेत. तब्बल ४,५०० हून अधिक कोकणी गाणी सादर करण्याचे ऐतिहासिक उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, या महाप्रकल्पात गोव्यातून तब्बल ५३ संघांनी सक्रिय सहभाग नोंदवून उत्सवाची शान वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.