Goa Tourism
Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांसाठी सुरु केली नवी हेल्पलाइन

दैनिक गोमन्तक

Tourism In Goa: गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रमोद सावंत सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेऊ लागले आहे. यातच राज्याच्या पर्यटन विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी एक हेल्पलाइन सुरु केली आहे. जेणेकरुन पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळांची योग्य माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर काही तक्रारी असतील तर नोंदवू शकतील, तसेच संबंधितांना त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. (New Tourism Helpline To Help Visitors With Info Stakeholders With Complaints)

“पर्यटनाचा नवीन हंगाम सुरु होण्यापूर्वी हेल्पलाइन सुरु करण्याची पर्यटन विभागाची योजना आहे,” असेही पर्यटन अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, कळंगुटमधील पर्यटन स्टेकहोल्डर अल्बर्ट लोबो म्हणाले की, 'हेल्पलाइन सुरु करण्याची नितांत गरज होती आणि विभागाने ती सुरु करण्याचा विचार केला याबद्दल आम्ही पर्यटन विभागाचे कौतुक करतो.'

दुसरीकडे, “फक्त पर्यटकांनाच मदतीची गरज असते असे नाही, तर पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांनाही काही वेळा अवघड जाते. प्राधिकरणाकडे औपचारिक तक्रार करण्यास वेळ लागतो म्हणून हेल्पलाइन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा," असे लोबो म्हणाले.

हेल्पलाइनबद्दल, ते पुढे म्हणाले, 'तक्रारकर्त्याला लक्ष्य केले जाऊ नये म्हणून प्राधिकरणाकडे आपली ओळख उघड न करता बेकायदेशीरतेची तक्रार करण्यास उपयुक्त ठरेल.'

लोबो पुढे म्हणाले की, 'कळंगुट (Calangute)-बागा पट्ट्यामध्ये गेल्या दोन दशकांत व्यापारी व्यवसायासाठी जागा शोधत आहेत, ज्यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे.'

तसेच, “कधीकधी, पर्यटक गोंधळलेले असतात आणि त्यांना काय करावे हे कळत नाही? चुकून काही पर्यटक एखाद्या विशिष्ट ठिकाणाची माहिती घेण्यासाठी चुकीच्या लोकांकडे जातात, अशा वेळी हेल्पलाइन खूप मदत करेल,” असेही लोबो म्हणाले.

दुसरीकडे, जर पर्यटकांना (Tourists) माहिती घ्यायची असेल किंवा कोणतीही अनुचित घटना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची असेल तर, त्यांना विभागाकडे जावे लागतेच. परंतु बहुतेक, लोक सोशल मीडियावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

“सोशल मीडियावर पर्यटकाने पोस्ट केलेल्या माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा हेल्पलाइनशी संपर्क साधणे हा उत्तम पर्याय असू शकतो. काही वेळा, लोक जेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी पोस्ट करतात किंवा गोव्यात (Goa) त्यांनी भेट दिलेल्या एखाद्या ठिकाणाची माहिती शेअर करतात तेव्हा आम्ही अतिशयोक्ती करताना पाहतो,” असे शॅक मालक आणि शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे सचिव जॉन लोबो म्हणाले.

शिवाय, मोरजीचे रहिवासी प्रसाद पोलजी म्हणाले की, काही देशी पर्यटकांनी गोव्यातील रशियन समुद्रकिनाऱ्यावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. “गोव्यात रशियन समुद्रकिनारा कुठे आहे? तुम्हाला कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर काही रशियन आढळल्यास, तो रशियन समुद्रकिनारा होत नाही. मला खात्री आहे की, व्हिडिओ पाहून बरेच लोक गोव्याला भेट देतील. आणि रशियन समुद्रकिनारा शोधतील,” ते पुढे म्हणाला. “योग्य माहिती मिळवण्यासाठी आणि तक्रारी पोस्ट करण्यासाठी हेल्पलाईन एक उत्तम माध्यम असेल,” असेही पोलजी पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa Today's Live News Update: फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT