Goa Tourism: कळंगुटमधील पर्यटन व्यवसायावर तिसऱ्या लाटेचा फटका

अनेक रेस्टॉरंट्स, शॅक मालक पुढील महिन्यापर्यंत बंद करण्याचा विचारात.
Goa Tourism: Third wave in Calangute
Goa Tourism: Third wave in CalanguteDainik Gomantak

गोवा: राज्यात करोनाचा आलेख वाढतच आहे. राज्यात काल दिवसभरात एकूण 2174 नवीन रुग्ण बाधित झाले असून, राज्यात आजच्या घडीला 21,957 इतके बाधित रुग्ण आहेत. करोना बंधितांचा हा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. (Third wave takes toll on tourist biz in Calangute)

Goa Tourism: Third wave in Calangute
वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेसचा दूधसागरजवळ अपघात

करोनाच्या (COVID-19) या तिसऱ्या लाटेचा कळंगूट-कांदोळी (Candolim) पर्यटन केंद्रातील व्यवसायांना देखील फटका बसला असून, यामध्ये अनेक रेस्टॉरंट्स, शॅक (Shack) मालक पुढील महिन्यापर्यंत बंद करण्याचा विचार करत आहेत. यातील काहीनी तर या आधीच आपल्या व्यवसायाला टाळे लावले आहे. कळंगुटमधील (Calangute) शॅक व्यावसायिक " मॅन्युएल कार्डोझो, पारंपारिक शॅक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, यांनी दिलेल्या माहितीनुसार “गेल्या काही दिवसांपासून कांदोळीमधील काही शॅक आधीच बंद आहेत. मी या महिन्याच्या शेवटपर्यंत वाट पाहीन नाहीतर, पुढच्या महिन्यापासून मीदेखील शॅक व्यवसाय बंद ठेवेन .

व्यावसायिकांमध्ये होते उत्साहाचे वातावरण

मागील वर्षी कोरोना महामारीमुळे कोलमडलेला शॅक व्यवसाय यावर्षी वेळेवर सुरू झाल्याने शॅक व्यवसायिकांमध्ये उत्साह आहे. पर्यटन खात्याकडून तीन वर्षांसाठी मिळालेल्या शॅक्स व्यवसायाचा यंदा हे तिसरे वर्ष असल्याने अधिकाधिक उलाढाल होण्याची व चार्टर विमानांची प्रतिक्षा शॅकधारकांना होती.

परवाना शुल्कसाठी जमा केलेली रक्कमही झालेल्या व्यवसायातून वसूल झाली नाही

वर्षासाठीसाठीची परवाना शुल्कसाठी जमा केलेली रक्कमही झालेल्या व्यवसायातून वसूल झाली नाही. त्यानंतर हा व्यवसाय बंद झाला, राज्यात सुमारे 35 हून अधिक समुद्रकिनारी 355 शॅकना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी दक्षिण गोव्यात 105 तर उत्तर गोव्यात 250 शॅक उभारण्यास परवानगी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com