New Rules For Tourists in Goa Dainik Gomantak
गोवा

New Rules For Tourists : गोव्यात येण्याआधी हे एकदा वाचाच! पर्यटकांच्या परवानगीशिवाय सेल्फी काढाल तर...

गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी सूचना जारी केली आहे

Kavya Powar

New Rules For Tourists in Goa : गोव्यात सर्वच महिने पर्यटकांची रेलचेल असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर बऱ्याचदा आपण देशी पर्यटकांना विदेशी पर्यटकांसोबत फोटो काढताना बघतो. ही गोष्ट सर्रास गोव्यात चालते. पण आता इथून पुढे हे करता येणार नाही.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गोव्यात असाल आणि इतर पर्यटकांसोबत सेल्फी घेऊ इच्छित असाल किंवा तुम्हाला त्यांचे फोटो काढायचे असतील, तेव्हा गोपनीयतेचा आदर करण्यासाठी तसे करण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्या.

ही सूचना गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी जारी केली आहे; आणि या निर्देशांचा उद्देश प्रवाशांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच इतर गोष्टींबरोबरच अनैतिक घटकांकडून फसवणूक होऊ नये यासाठी आहे.

या गोष्टींची पर्यटन विभागातर्फे मनाई

सामान्यत: देशी पर्यटक विदेशी पर्यटकांच्या परवानगीशिवाय सेल्फी घेत असतात. याबाबत पर्यटन विभागातर्फे दिलेल्या निर्देशात सांगण्यात आले आहे की, पर्यटकांच्या परवानगीशिवाय त्यांची छायाचित्रे घेऊ नका. विशेषत: सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहताना आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी असे कृत्य करू नका.

त्याचबरोबर अॅडव्हायझरीमध्ये अपघात टाळण्यासाठी समुद्रातील खडक असलेल्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास इथे येणाऱ्या पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. विभागाने प्रवाशांना वारसा स्थळांची नासधूस किंवा नुकसान न करण्याचा आणि इथे असलेली स्मारके विद्रूप न करण्याचा सल्ला दिला आहे.

पर्यटकांना समुद्रकिनारे किंवा गोव्यातील कोणत्याही खुल्या भागात दारूचे सेवन करण्यास मनाई आहे आणि हा दंडनीय गुन्हा आहे. त्यासाठी पर्यटक शॅक्स/रेस्टॉरंट्स, हॉटेल्स इत्यादी सारख्या कायदेशीर परवाना असलेल्या परिसरात दारूचे सेवन जबाबदारीने शकतात.

पर्यटक प्रामुख्याने जलक्रीडा करण्यासाठी गोव्यात येत असतात. पण अशावेळी समुद्रपर्यटन बुकिंगसाठी बेकायदेशीर एजंट्सकडे बुकिंग न करण्याचा सल्ला विभागातर्फे देण्यात आला आहे. पर्यटकांनी अशा सेवांचे बुकिंग करताना पर्यटन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा आग्रह धरला पाहिजे आणि अशा सेवा फक्त नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाइन पोर्टलवरूनच बुक कराव्यात असे पर्यटन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, खुल्या भागात अन्न शिजवण्यास मनाई आहे आणि या नियमाचे उल्लंघन केल्यास स्वयंपाकाच्या वस्तू जप्त करण्याबरोबरच संबंधितांवर कारवाई करत 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा गोव्यात यायचा विचार असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

IFFI 2024: Golden Peacock साठी 7 चित्रपटांत चुरस! पदार्पणातील पारितोषिकासाठी 2 Indian Films स्पर्धेत..

Goa Opinion: केवळ मुसलमान म्हणून विरोध?

Priya Yadav Case: 'प्रिया'चे Cash For Job कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? ‘ते’ रेल्वे अधिकारी कोण? रोज नवीन भानगडी उघडकीस

SCROLL FOR NEXT