Cruz Silva  Dainik Gomantak
गोवा

Arambol News: 'गोवा वाचवण्यासाठी गाव टिकून राहिला पाहिजे'! नव्या आराखड्यासाठी हरमल येथे जनआंदोलनाला सुरुवात

Cruz Silva: प्रादेशिक आराखडा २०२१ तयार केला होता. त्यात कसलेच बदल न करता, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. मात्र नवीन करताना दहा वर्षांसाठी केला पाहिजे. त्यात कसलाच बदल गरज नाही, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Arambol Witnesses Launch of Movement Against Unsustainable Urbanization

हरमल: राज्यात अमर्यादपणे केली जाणारी भू-रुपांतरे बंद करावीत. नवा प्रादेशिक आराखडा करून नियोजनबद्ध पद्धतीनेच गाव व शहरांचा विकास करावा, यासाठीच्या जन आंदोलनाला आज हरमल येथून सुरुवात करण्यात आली.

पेडणे तालुका नागरिक समितीने यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दोनशे रुपयेच वर्गणी स्वीकारून या बैठकीचे आयोजन करत लोकसहभागातून लोकलढा उभारण्याचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न समितीने केला आहे.

याआधी पेडण्याच्या नियोजन आराखड्याला समितीने मोठा विरोध केला होता. त्याच धर्तीवर हे नवे आंदोलन उभे करण्याची तयारी समितीने चालवली आहे. आमदार क्रुझ सिल्वा या बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले, गोव्याच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी गाव टिकून राहिला पाहिजे. त्यामुळे २०२१ प्रादेशिक आराखडा तयार करून घेण्यात आला. प्रत्येक पंचायतीने गावचे नियोजन केले होते, त्या धर्तीवर आता नवा आराखडा करण्याची गरज आहे.

बैठकीत गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व गोंयकारपण शाबूत ठेवण्यासाठी प्रादेशिक आराखडा त्वरित अमलात आणण्याची गरज व दोन्ही कलमे १७ बी व ३९ ए त्वरित रद्द करताना, त्यापूर्वीच आराखडा तयार करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

हरमल पंचायत सभागृहात आयोजित पेडणे नागरिक समितीच्या प्रादेशिक आराखडा व कलम रद्द करण्याबाबत जागृती बैठकीत बोलत होते. गोव्यातील पंचायतीने संमत केलेला प्रादेशिक आराखडा २०२१ तयार केला होता. त्यात कसलेच बदल न करता, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. मात्र नवीन करताना दहा वर्षांसाठी केला पाहिजे. त्यात कसलाच बदल गरज नाही, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

सरकारला केवळ आंदोलन केल्यानंतर जाग येते, असे आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे म्हणाले. मंत्र्यांना काळे बावटे दाखवून निषेध करण्याची मागणी दिपेश नाईक यांनी केले. भोमा-अडकोणचे नागरिक संजय नाईक यांनी गोवा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ते वाचवण्यासाठी जनतेने प्रखर विरोध केला पाहिजे, असे सांगितले.

सरकार घाऊक पद्धतीने गोव्याची विक्री करीत त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडणे नागरिक समितीच्या कार्यास सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अध्यक्ष देवेंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ॲड. सदानंद वायगंणकर यांनी विचार व्यक्त केले.

शिवोलीचे माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडिस, संजय बर्डे, दिपेश नाईक, ॲड. प्रसाद शहापूरकर, व्यंकटेश नाईक, माजी सरपंच इनासियो डिसोझा, समितीचे अध्यक्ष पटेकर, तालिगावचे ग्रामस्थ फ्रान्सिस कोएलो, मार्शल परेरा, जामन मांद्रेकर, मरियान फैराव, चोपडे अमोल राऊत, विवेक गावकर, संजीव गावकर, समितीचे अध्यक्ष पुंडलिक धारगळकर, उपाध्यक्ष मेल्विन डिसोझा उपस्थित होते. व्यंकटेश नाईक यांनी आभार मानले.

जनतेने जागृत राहावे!

सरकार झोपेचे सोंग घेत असून जनतेने झोप न घेता, मागणी पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसू नये. सातत्याने लढा देण्यासाठी जागृत राहायला हवे. गोवा रेड्डी, बिड्डी यांचा नसून गोवा राखून ठेवण्याची गरज आहे. जमीन रुपांतरण नोटिसा प्रसिद्ध झाल्या. त्यात गोमंतकीय कोणीही नाही, याचे दुःख आहे, असे मत रामराव वाघ यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT