CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: म्हार्दोळनंतर 'या' ठिकाणी होणार नवीन पोलिस स्थानक! - मुख्यमंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत: म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे लोकार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant गोमंतकीय माणूस सहसा गुन्हे करायला धजावत नाही, पण गोव्याबाहेरून येणाऱ्या लोकांकडूनच गोव्यात मोठे गुन्हे होत असून या लोकांना भाडेकरू म्हणून ठेवताना प्रत्येकाने त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कोलवाळनंतर म्हार्दोळ पोलिस स्थानक कार्यरत झाले असून आता यापुढे मांद्रेत नवीन पोलिस स्थानक सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रियोळ मतदारसंघातील म्हार्दोळ येथे नवीन पोलिस स्थानकाचे आज (गुरुवारी) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी स्थानिक आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, श्रमेश भोसले तसेच सरपंच हर्षा गावडे, शैलेंद्र पणजीकर, दामोदर नाईक, विनायक वेंगुर्लेकर, सर्वेश गावडे, जयेश नाईक, विशांत नाईक व इतर मान्यवरांसह पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलिस उपमहासंचालक ओमवीर सिंग व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, की राज्यातील गुन्हे कमी करण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची आहे असे नव्हे तर प्रत्येक नागरिकाने सजग राहिले पाहिजे. गोमंतकीय माणूस सहसा गुन्हा करायला जात नाही. गुन्हा झालाच तर तो तीव्र स्वरूपाचा असत नाही.

मात्र, गोव्याबाहेरील इतर राज्यांतून गोव्यात येणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहेत, हे गुन्हे रोखण्यासाठी अशा लोकांना भाडेकरू म्हणून ठेवताना प्रत्येक घरमालकाने विचार करायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले की, म्हार्दोळ पोलिस स्थानक कार्यरत झाल्यामुळे प्रियोळबरोबरच इतर भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत असल्याने मनाला समाधान वाटत असून नागरिकांनी ठेवलेला विश्‍वास आणि दिलेले सहकार्य यापुढेही या सरकारला कायम रहावे असे सांगताना मुख्यमंत्र्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच प्रियोळ मतदारसंघाचा सातत्याने विकास होऊ शकला, असे गोविंद गावडे म्हणाले.

गुन्ह्यांच्या तपासात गोवा अव्वल...

देशातील इतर राज्यांतील गुन्हे पाहिल्यास गोवा गुन्हे तपासात अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय सूत्रांच्या माहितीनुसार आणि जाहीर केलेल्या तक्त्यानुसार गोव्याने गुन्हे तपासात ९४ टक्के यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वी लोक पोलिस म्हटल्यावर घाबरायचे, पण आता पोलिस हे जनतेचे मित्र आहेत आणि मित्रांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्यानुसार प्रत्येकजण जागला, तर गोव्यात गुन्हे होणारच नाहीत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT