Water Transport
Water Transport Dainik Gomantak
गोवा

Water Transport: जलवाहतूक सुलभ बनवण्याच्या दृष्टीने नवीन फेरी धक्के- सुभाष फळदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील प्रवासी जलवाहतूक अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने नदी परिवहन खाते काम करत आहे. यासाठी आवश्‍यक असलेली साधन सुविधा निर्माण करण्याकरिता नवीन ९ प्रवासी फेरी धक्के प्रस्तावित केले आहेत.

हळदोणे, रायबंदर, जुने गोवे, पिळगाव, बाणस्तारी, रसाई, दुर्भाट, शिरोडा आणि सावर्डे हे जलमार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

धक्क्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आल्याने एकूण खर्च ७३.०४ कोटी रुपये येणार आहे. यात केंद्र आणि राज्याच्या ५० टक्के हिस्सा असणार आहे,असेही उत्तरात म्हटले आहे. पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी फेरी धक्क्यासंदर्भात अतारांकित प्रश्‍न विचारला होता.

जलमार्ग प्रवास आणखी सुलभ बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचा भाग म्हणून पणजी - चोडण जलमार्गावर सौर्य ऊर्जा फेरी सेवा सुरू केली आहे. पर्यावरणपुरक अशी ही बोट असून इंधानाचा वापर कमी करून प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न खात्याकडून होत आहे, असे फळदेसाई यांनी उत्तरात म्हटले आहे. राणे यांनी सौरऊर्जा फेरीचा मुद्दा उपस्थित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT