Drawing competition
Drawing competitionDainik Gomantak

Gomantak-Sakal Drawing competition: गोव्यात 25 हजार बालचित्रकार

गोमन्तक-सकाळच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

राज्यातील विद्यार्थ्यांना ज्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता लागून राहिलेली असते, त्या गोमन्तक-सकाळच्या शनिवारी झालेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यभरात 48 केंद्रांवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 25 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्र काढण्याची कला प्रत्यक्षात स्पर्धेच्या माध्यमातून समोर आणण्याची उत्सुकता मुलांमध्ये दिसून आली.

देशभरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा गोमन्तक आणि सकाळ ग्रुपच्या वतीने शनिवारी राज्यातील 48 केंद्रांवर आयोजित केली होती. लाखो रुपयांची बक्षिसे असणाऱ्या या स्पर्धेचे मुलांमध्ये जबरदस्त आकर्षण आहे. त्यामुळे या स्पर्धेला दरवर्षी मुलांचा प्रतिसाद वाढत आहे. सलग 37 वर्षे ही स्पर्धा सुरू आहे. यंदा या स्पर्धेचे 38 वे वर्ष आहे. गोव्यासह महाराष्ट्रातही ही स्पर्धा एकाचवेळी पार पडली. गोव्यात या स्पर्धेसाठी पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड (पीपीएल) ही कंपनी प्रायोजक म्हणून लाभली.

Drawing competition
Water Supply Shortage : गोव्यात 'या' ठिकाणी पाणीपुरवठा असणार मर्यादित

विशेष मुलांचाही सहभाग

गोव्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेत पर्वरीतील संजय स्कूलच्या विशेष मुलांनीही भाग घेत आपल्यातील कला कागदावर उतरविली. स्पर्धेसाठी वयोगटानुसार चार गट ठेवले होते आणि या गटांना चित्रकलेचे चार वेगवेगळे विषय दिले होते. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर मुलांना चित्र काढायचे होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ‘गोमन्तक’तर्फे ही स्पर्धा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. यातून मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते. त्यातून मुलांच्या कला-गुणांना वाव मिळतो.

- योगानंद नागवेकर, मुख्याध्यापक, शारदा इंग्लिश हायस्कूल,माशेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com