Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : गोव्यात खनिज उद्योगाचा नवा अध्याय सुरु होणार

डिचोली खाण वेदांताकडेच; तब्बल 43 हजार कोटींचा महसूल स्रोत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining : गोव्याच्या खनिज उद्योगाचा नवा अध्याय आजपासून सुरू झाला आहे, असे मानावे लागेल. कारण सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने जाहीर केलेल्या ई-लिलावात ब्लॉक क्र. 1 डिचोलीसाठी इतर पाच कंपन्यांसह वेदांता खाण कंपनीने बोली लावली होती. बुधवारी झालेल्या ऑनलाईन अंतिम बोलीमध्ये वेदांताने सर्वाधिक 63.55 टक्के महसुलाची बोली लावत ही खाण आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, खाण आणि भूगर्भशास्त्र संचालक डॉ. सुरेश शानभोग उपस्थित होते. गुरुवारी शिरगाव-मये ब्लॉकचा लिलाव होणार आहे. लिलावास पात्र पाच कंपन्यांनी 63 टक्के महसुलाची प्राथमिक आधारभूत किंमत दिली होती.

ही किंमत आधारभूत मानून खात्याच्या वतीने अंतिम बोली जाहीर केली. त्यावर टप्प्या-टप्प्याने 63.55 टक्के ही वेदांताची बोली जाहीर झाल्यानंतर पुढच्या आठ मिनिटांनंतर इतरांनी आपली बोली जाहीर केली नसल्याने वेदांताला खनिज उत्खननासाठी ही खाण मिळाली. या संपूर्ण ई-लिलाव प्रक्रियेतून 43 हजार कोटींचा महसुलाचा स्रोत मिळाल्याने खनिज उत्खननाचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT