Goa Education DainikGomantak
गोवा

Goa Education: शैक्षणिक वर्षाच्या निर्णयानंतर नवीन अपडेट! घोकंपट्टी, पेन-पेपरशिवाय होणार परिक्षा; 'रुब्रिक' पद्धतीने मूल्यांकन

New Educational Policy: नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देताना सहावीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांच्या २० गुणांची मूल्यांकन परीक्षा रुब्रिक पद्धतीने होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: घोकंपट्टी करून प्रश्‍नांची उत्तरे लिहिणे आता बंद होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देताना सहावीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांच्या २० गुणांची मूल्यांकन परीक्षा रुब्रिक पद्धतीने होणार आहे.

तसेच शालेय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटी व गोवा बोर्डतर्फे काढण्यात येणार असल्याचे एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले. रूब्रिक पद्धत म्हणजे पेन आणि पेपरशिवाय परीक्षा होणार आहे.

जर विद्यार्थ्यांचे भाषाविषयक मूल्यांकन करायचे असेल, तर त्यासाठी विद्यार्थी कशा पद्धतीने पुस्तक वाचतो, कसे बोलतो, कसे ऐकतो, कसे लिहितो, त्याचे भाषेवर कसे प्रभुत्व आहे हे पाहिले जाईल, विज्ञानाच्या बाबतीत त्याला प्रकल्प करायला सांगण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थी पाठांतरावर भर न देता विषय समजून घेण्यावर, आपले कौशल्य वाढविण्यावर भर देईल, असेही शेटगावकर यांनी सांगितले.

रुब्रिक या मूल्यांकन पद्धतीद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यास मदत होते. रुब्रिकचा वापर निबंध सादरीकरण, गट प्रकल्पांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यांकन करता येते. जी आज शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची मूल्यांकन पद्धती मानली जाते.

असे होणार बदल...

इयत्ता सहावीपासून आठवीपर्यंतच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका आता एससीईआरटीद्वारे तयार करणार आहे.

आठवीपासून पुढील शिक्षणाच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका गोवा बोर्ड काढणार आहे. उत्तरपत्रिका मात्र शालेय स्तरावरच तपासल्या जातील.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे शिकविणे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे प्रश्‍न आल्यास विद्यार्थी उत्तरे लिहिण्यास सक्षम असतील, असा यामागचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT