Public Works Minister Shivendra Raje Bhosale Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गासाठी आता नवा मुहूर्त, बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

Mumbai Goa Highway: परशुराम घाटातील कोसळलेल्या संरक्षक भिंती संबधित कंत्राटदाराकडून उभारणार आहोत, असे मंत्री भोसले म्हणाले.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

मुंबई: गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण होण्याचे नाव काही घेत नाही. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून नवीन डेडलाईन देण्यात येत असून, आता महामार्गासाठी नवा मुहूर्त देण्यात आला आहे. राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई गोवा महामार्गाला विलंब झाल्याचे सांगितले. २०११ पासून या महामार्गाचे काम सुरु असून, कोकणात जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे. चिपळूण येथील पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत या पूलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिली. पूल कोसळल्याप्रकरणी कंत्राटदार आणि अभियंता दोघांना प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावल्यात आल्याचेही भोसले म्हणाले.

तसेच, पूलाचे काम संबधित ठेकेदाराला स्वखर्चातून करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मंत्री सावंत यांनी दिली.

मुंबई - गोवा महामार्गाबाबत माहिती देताना मंत्री भोसले म्हणाले की, पनवेल - इंदापूर - पत्रादेवी पर्यंत महामार्गाची लांबी ४६० किलोमीटर आहे. इंदापूर आणि मानगाव बायपास मार्ग रखडल्याची माहिती मंत्री भोसले यांनी दिली. दरम्यान, यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. या दोन्ही बायपाससाठी अकरा महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचे भोसले म्हणाले.

परशुराम घाटातील कोसळलेल्या संरक्षक भिंती संबधित कंत्राटदाराकडून उभारणार आहोत, असे मंत्री भोसले म्हणाले. यासाठी कोणताही वेगळा निधी राज्य सरकार देणार नसल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२५ नाही पण जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातून 'सेटलमेंट'चा डाव? तारक आरोलकरांच्या कथित ऑडिओने खळबळ; न्यायालयात पेनड्राईव्ह सादर

ENG vs PAK: इंग्लंड दौऱ्यात पाकड्यांची नाचक्की! खेळाडूचा 'किंग चार्ल्स'ला भेटण्यास नकार; सर्फराज अहमदची हकालपट्टी

Viral Post: ना ऑफिसची कटकट, ना ट्रॅफिकचं टेन्शन! हिमाचल सोडून थेट गोव्याचा समुद्र गाठला; 'Work From Home' करणाऱ्या तरुणाची अनोखी कहाणी VIDEO

Goa Coastal Zone Management Plan: गोव्याचा सीआरझेड आराखडा तयार, पण अंतिम मंजुरी बाकी; महिनाभरात हरकती-सूचनांसाठी खुला होणार?

Goa Employment: 'स्थानिकांना केवळ रोजगाराची स्वप्ने दाखविली जातात'! आमदार चंद्रकांत शेट्येंचा गुदिन्‍होंवर निशाणा; औद्योगिक वसाहतींमधील प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT