Goa Police: निवृत्त PSI चे लाजीरवाणे कृत्य! घरात घुसून केला महिलेचा विनयभंग आणि लैंगिक छळ

Assolda Quepem Crime: पीडित महिलेने केपे पोलिसांत जी तक्रार दिली आहे त्‍यात, ती महिला २०२३ पासून आपल्‍या पतीपासून विभक्‍त झाली असून ती आपल्‍या लहान मुलाबरोबर असोल्‍डा येथे राहते.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: असोल्‍डा-केपे येथील निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सदानंद राऊत देसाई यांच्‍याविरोधात केपे पोलिसांत त्‍यांच्‍या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्‍याचा गुन्‍हा नाेंद झाला असून याप्रकरणी ती पीडित महिला आणि तिच्‍या लहान मुलाची जबानी केपे न्‍यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेतली.

त्या निवृत्त उपनिरीक्षकाच्‍या विरोधात विनयभंग करण्‍याच्‍या उद्देशाने हल्‍ला करणे, लैंगिक छळ, शारीरिक इजा पोहोचविण्‍याची धमकी देणे आणि बेकायदा घरात घुसणे या कलमांखाली गुन्‍हा नोंद केला आहे.

केपेचे पोलिस निरीक्षक अरुण सांगोडकर यांना यासंदर्भात विचारले असता, राऊत देसाई यांच्‍याविराेधात त्‍यांच्‍या शेजारी राहाणाऱ्या एका महिलेने २७ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भात गुन्‍हा नोंद करून पोलिस तपास सुरू झाला आहे.

याच चाैकशीचा भाग म्‍हणून त्‍या पीडितेची आणि तिच्‍या लहान मुलाची न्‍यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवून घेण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, हा गुन्‍हा नोंद झाल्‍यानंतर पीडित महिलेचे सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्‍हिएगस यांनी समुपदेशन केले होते, अशी माहिती व्‍हिएगस यांनी दिली.

Goa Crime News
Goa Crime: जमिनीच्या वादातून जोडप्यावर प्राणघातक हल्ला, CCTV फोडले, आरोपी 'अल्पवयीन' म्हणून मोकाट

पीडित महिलेने केपे पोलिसांत जी तक्रार दिली आहे त्‍यात, ती महिला २०२३ पासून आपल्‍या पतीपासून विभक्‍त झाली असून ती आपल्‍या लहान मुलाबरोबर असोल्‍डा येथे राहते. संशयित तिचा शेजारी असून नोव्‍हेंबर २०२४ पासून त्‍याने आपल्‍याशी लगट करण्‍याचा प्रयत्‍न केला. काहीवेळा रात्रीच्‍यावेळी त्‍याने आपल्‍याला फोन करण्‍याचाही प्रयत्‍न केला. मात्र, आपण त्‍याला प्रतिसाद दिला नाही.

Goa Crime News
Goa Crime: 10 वर्षांच्या लकीने रचला डाव; वर्गमित्र आणि त्याच्या आजोबांना काठीने मारहाण

२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा.च्‍या सुमारास संशयित आपल्‍या घरात घुसला. त्‍याने आपल्‍या केसांना धरून खाली आपटले. त्‍यानंतर आपल्‍यावर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, आपण स्‍वत:ची सुटका करून घेऊन आतल्‍या खोलीत पळून गेले आणि दार बंद केले. त्‍यानंतर संशयिताने आपल्‍याला धमकी दिली, असे म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com