new bridge work Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: भुईपाल चेक पोस्टजवळील नव्या पुलाच्या कामाला सुरवात; स्थानिकांत समाधान

MLA Deviya Rane: आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना यश

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Deviya Rane: होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल-सत्तरी येथील चेक पोस्टजवळ नवीन पुलाच्या कामाला प्रारंभ झाला असून या पुलामुळे वाहतुकीची चांगली सोय होणार आहे.

येथील जुना पोर्तुगीजकालीन पूल लहान व वळणावर असल्याने अनेकदा अपघातास कारणीभूत ठरत होता. त्यामुळे येथे नवीन पूल व्हावा, अशी मागणी स्थानिकांतून वारंवार होत होती.

त्यामुळे आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी या पुलाच्या मागणीची पूर्तता केली असून पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यामुळे स्थानिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

सविस्तर वृत्त असे, की भुईपाल हा वाळपई-पणजी मार्गावरील मुख्य रस्ता असून दिवस रात्र वाहनांची व नागिरकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.

स्थानिक आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी या पुलाच्या प्रस्तावाला आठ महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळवून दिली होती. मात्र, पुढे पावसाळा असल्याने काम सुरू करता आले नव्हते. आता पावसाळा संपल्यानंतर चार दिवसांपूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

या पुलासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण केले जाणार आहे. सध्या वाहनांसाठी रस्ता रुंद करण्यात आला असून पर्यायी वाहतुकीची सोय करण्यात आली आहे.

स्थानिक रहिवाशी बी.डी. मोटे म्हणाले, हा पूल पोर्तुगीजकालीन असल्याने नवा पूल गरजेचाच होता. आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे.

यासाठी स्थानिक पंचसदस्य स्मिता मोटे यांचेही आभारी आहोत. सध्या भुईपाल परिसरात विविध विकास कामे मार्गी लागली असून याबद्दल स्थानिकांत समाधान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT