Bolkarne bridge madhalwada Dainik Gomantak
गोवा

Bolkarne: ऐन पावसाळ्यात बोळकर्णेत पुलाचे काम, विद्यार्थ्यांची होतेय ‘सर्कस’; शिडीवरून धोकादायक प्रवास

Bolkarne Bridge: मधलावाडा-बोळकर्णे येथील जीर्ण झालेला पोर्तुगीजकालीन पूल मोडून नवा बांधावा, अशी मागणी स्‍थानिक गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून करत होते.

Sameer Panditrao

फोंडा: मधलावाडा-बोळकर्णे येथील जीर्ण झालेला पोर्तुगीजकालीन पूल मोडून नवा बांधावा, अशी मागणी स्‍थानिक गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून करत होते. त्‍यांच्‍या या मागणीची दखल घेऊन सरकारने नवीन पुलाचे काम सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या पुलाच्‍या कामासाठी निविदा काढण्‍यात आली होती. पण जमीनमालकांकडून कायदेशीर परवानगी वेळेत न मिळाल्‍याने पुलाचे काम उशिरा

सुरू झाले. दरम्‍यान, पावसाळ्याच्‍या तोंडावर जुना पूल मोडल्याने लोकांना विशेषत: विद्यार्थ्यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे.

रगाडा नदीला पावसाळ्यात महापूर येतो. त्‍यामुळे सध्‍या पुलाच्या बाजूला मातीचा ढिगारा टाकून त्यावर शिडी (निसण) दोन्ही बाजूंनी लावली आहे. या शिडीवरून चढणे व उतरणे विद्यार्थी व वयस्कर लोकांना जिकिरीचे होत आहेत.

मात्र, चांगला प्रकल्प गावात येत असेल तर लोकांनी थोडी कळ सोसावी, थोडा त्रास सहन करावा, असे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश देसाई यांनी सांगितले.

नियोजनशून्‍य कारभाराचा फटका

गावात मोबाईल टॉवर, जलप्रकल्प व पुलाच्या रस्त्यासाठी आम्ही जमिनी दिल्या. पण आम्हाला, आमच्‍या मुलांना सरकारी नोकरी मिळाली नाही, अशी खंत सनोबा देसाई यांनी व्‍यक्त केली. पोर्तुगीजकालीन जुना व कमकुवत पूल मोडून नवीन पूल उभारण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण काम सुरू करण्‍यापूर्वी पावसाळ्याचासुद्धा विचार करणे गरजेचे होते. अभियंता व कंत्राटदाराच्या नियोजनशून्‍य कारभाराचा फटका स्थानिकांना बसत आहे, असे सनोबा देसाई यांनी सांगितले.

स्‍थानिकांसह पर्यटकांची गैरसोय

तांबडी-सुर्ला येथे पुरातनकालीन श्री महादेव मंदिर आहे. सध्‍या मधलावाडा येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यटकांची व स्थानिकांची वाहने साकोर्डा देऊळमळ येथून दोन पूल पार करून न्‍यावी लागतात. नदीला पूर आला तर या वाहनांना ये-जा करता येत नाही. नुवे आगलोतमार्गे जाण्यास मिळते, पण ते अंतर खूप पार करावे लागते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'तो' शेवटचा चेंडू ठरला आयुष्यातील अंतिम क्षण; हृदयविकाराच्या झटक्याने गोलंदाजाचा मैदानावरच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Ranji Trophy: गोवा संघाशी भिडणार IPLचा शतकवीर; पर्वरीत रंगणार सामना; रणजी सामन्यात चंदीगडचे आव्हान

Mayem Lake: ‘या...या, मया या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तलावाकडे पर्यटकांची पाठ! 10 कोटींचा खर्च पाण्‍यात; बससेवासुद्धा बासनात

बिष्णोई गँगची माणसं आहे! दारूच्या नशेत तंगाट पर्यटकांचा कळंगुट येथील हॉटेलमध्ये राडा; पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

Kadamba Bus: याचिकेने आणली ‘कदंब’ला जाग! आसगाव–म्हापसा मार्गावर अतिरिक्त बस सुरू; सुनावणीनंतर उचलले पाऊल

SCROLL FOR NEXT