भाटी ः लोखंडी पुलाची पाहणी करताना सांगेचे आमदार प्रसाद गावकर. (मनोदय फडते) 
गोवा

भाटी पंचायत क्षेत्रात साकारणार नवीन पूल

मनोदय फडते


सांगे
सांगे तालुक्यातील भाटी पंचायत क्षेत्रातील वालशे डोंगर गावाला जोडणारा पोर्तुगीजकालीन छोटा पूल गतवर्षी कोसळला होता. त्यामुळे डोंगर गावाला जाणारा लोकसंपर्क तुटला होता. आज त्या जागी लाखो रुपये खर्चून सांगेचे आमदार प्रसाद गावकर याच्या पुढाकारातून १० टन क्षमतेचा लोखंडी पूल उभा राहिला आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे उद्‌घाटन होणार आहे. 
पंचेचाळीस वर्षे येथील नदीवर असलेला फुटब्रीज धोकादायक स्थीतीत होता, तरीही जीव मुठीत घेऊन डोंगर गावातील लोक या पदपुलावरून धोक्याचा प्रवास करत असत. गेल्या वर्षी पावसाळ्यात या पुलाने अखेरचा श्‍वास घेतला होता. पदपुलाचा एक भाग पाण्यात कोसळल्याने सुदैवाने त्यावेळी कोणीच पदपुल पार करत नसल्याने मोठा अनर्थ टळला होता. पदपूल कोसळल्याने येथील विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. 
आमदार प्रसाद गावकर यांच्याकडे स्थानिकांनी नव्या पुलाची मागणी केल्यानंतर आमदार गावकर यांनी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना बरोबर घेऊन पुलाची पाहणी केली. ४० दिवसांत नवीन लोखंडी पुलाची फाईल्स सरकार दरबारी मंजूर करून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत पदपुलाच्या जागी नवीन लोखंडी पूल उभा करून दिला आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे उद्‌घाटन पार पडणार आहे. 
आमदार गावकर यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, अनेक वर्षे येथील जनता नव्या पुलाची मागणी करत होते. डोंगर गावात सुमारे पंधरा घरे आहेत. या लोकांना बाजार, स्कूल, दूध व्यवसाय तसेच इतर कामासाठी शहरात तसेच इतर गावात जाण्यासाठी एकमेव पदपूल नदीवर उभा होता. गेल्यावर्षी पुरात कोसळून गेल्याने लोकांची तारांबळ उडाली होती. जेव्हा परिस्थिती समजली, तेव्हा वेळ न दवडता नव्या पुलाची फाईल्स मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापुढे ठेवली. त्यांनी त्याला तात्काळ मंजुरीही मिळाली. बांधकाम खात्याचे अभियंता नाडकर्णी व पार्सेकर यांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. 
बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी परिस्थीतीची दखल घेताना लोखंडी पदपूल उभारण्यासाठी वेळेत मदत केल्याने आज १०टन क्षमतेचा पूल या ठिकाणी उभा राहू शकला. अशा पद्धतीचे आणखी पुलांची कामे मार्गी लागणार असल्याची माहितीही आमदार गावकर यांनी दिली.

संपादन ः संदीप कांबळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT