New academic year in Goa starting from April
पणजी: यंदापासून नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय हा पालक आणि शिक्षकांच्या सोयीनुसार घेतलेला नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अधिक काळ शाळेत असणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोवा विज्ञान केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान सेतू कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, प्रकल्प समन्वयक मंजुळा यादव आणि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले की, विज्ञान सेतूच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करून संकल्पना समजून घेत आहेत. ज्यावेळी विद्यार्थ्यांना विषयासंंबंधीची संकल्पना समजते, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांची वृद्धी होते.
विज्ञान संकल्पना मुलांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे प्रयोग. ज्यावेळी प्रयोग करून प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते, त्यावेळी संकल्पना स्पष्ट करावी लागत नाही. आपण ज्यावेळी मातृभाषेतून समजावतो, त्यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत या संकल्पना अधिक स्पष्टपणे पोहोचतात. नवीन शैक्षणिक धोरणात देखील प्रयोगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे अशा उपक्रमांची गरज असल्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये विज्ञान सेतू हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे, जेथे विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शिक्षकांनी विज्ञानाची गोडी मुलांमध्ये रूजवावी असे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जपान येथे विज्ञान प्रदर्शनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.