Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतची पुस्तके दाखल! शाळांसाठी परिपत्रक जारी; शिक्षकांसाठी होणार प्रशिक्षण कार्यक्रम

Textbook For Goa Schools: डिचोली, बार्देश, पेडणे, तिसवाडी, मुरगाव, केपे, सांगे, सासष्टी या तालुक्यांमध्ये असणाऱ्या बीआरसीसी केंद्रात पुस्तके पोहोचली.

Sameer Panditrao

Goa School Textbook News

पणजी: एप्रिल २०२५ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षासाठी एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) सज्ज असून इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतची पुस्तके त्या-त्या तालुक्यातील बीआरसीसी केंद्रात दाखल झाली असल्याची माहिती एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी दिली.

डिचोली, बार्देश, पेडणे, तिसवाडी, मुरगाव, केपे, सांगे, सासष्टी  या तालुक्यांमध्ये असणाऱ्या बीआरसीसी केंद्रात पुस्तके पोहोचली असून शाळांनी ती ताब्यात घ्यावीत यासंदर्भातले परिपत्रक लवकरच निघणार असल्याची माहिती शेटगावकर यांनी दिली.

नऊ तालुक्‍यांमध्‍ये प्रशिक्षण

दहावीच्या शिक्षकांसाठी ब्लॉकस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन १ मार्च ते १५ मार्च या दरम्यान आयोजित केले असून सुमारे ५,५०० शिक्षकांना कोंकणी, मराठी, इंग्रजी, हिंदी, सामाजिक विज्ञान, शारीरिक शिक्षण, विज्ञान आणि गणित या विषयांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून एससीईआरटीने नऊ तालुक्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये पेडणे, बार्देस, तिसवाडी, मुरगाव, सासष्टी, काणकोण, डिचोली, सत्तरी,फोंडा, धारबांदोडा, सांगे आणि केपे तालुक्यांचा समावेश आहे, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT