Goa Hospital | Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College : 'जीएमसी’त नवे 4 एमडी अभ्यासक्रम

नव्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Medical College : गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला नॅशनल मेडिकल कमिशनने आणखी नवीन चार एमडी (पदव्युत्तर) अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

आगामी 2023-24 या शैक्षणिक वर्षात हे अभ्यासक्रम सुरू केले जातील. ही जीएमसीच्या शैक्षणिक कारकिर्दीतील ऐतिहासिक कामगिरी आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

मंत्री राणे म्हणाले, नॅशनल मेडिकल कमिशनने जीएमसीला जेरियाट्रिक मेडिसीन, इम्युनोलॉजी, हेमॉटॉलॉजी आणि रक्त संक्रमणामध्ये एमडी प्रोग्राम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे एमडी प्रोग्राममध्ये आणखी चार जागा जोडल्या जातील.

नव्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू केले जातील. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल मी गोवा मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता, त्यांचा कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करतो. हे अभ्यासक्रम ‘एम्स’सह देशातील काही महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध  आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

माणुसकीची ‘जीत’! मदुराईहून चेन्नईला हेलिकॉप्टरने नेले हृदय, गोव्यातील व्यक्तीला दिला पुनर्जन्म; आमदार आरोलकरांची कार्यतत्परता

Horoscope: वर्षाचा शेवटचा सप्ताहाचा प्रारंभ! 'या' राशींना मिळणार प्रगतीची नवी संधी, वाचा तुमचे भविष्य

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

SCROLL FOR NEXT