New 10 corona patients in Kankon
New 10 corona patients in Kankon 
गोवा

काणकोणात नव्याने दहा कोरोना रुग्ण

गोमंतक वृत्तसंस्था

काणकोण: काणकोणमध्ये गुरुवारी विविध भागात नव्याने पुन्हा दहा कोरोना पीडित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ६२२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४९५ रुग्ण बरे झाले आहेत. दहा रुग्ण आतापर्यंत कोरोनामुळे दगावले आहेत.

सध्या काणकोणात कोरोनाचे ११७ सक्रिय रुग्ण आहेत. आज सापडलेल्या दहा रुग्णांपैकी आठ रुग्ण काणकोण पालिका क्षेत्रातील आहेत. त्यामध्ये पाटणे, चावडी व पाळोळे येथील प्रत्येकी दोन, नगर्से व देवाबाग येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. शिवाय आंबडे-खोला येथील एक व कर्वे-गावडोंगरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी अजूनही लोकांनी काळजी घेण्याची गरज बनली आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाणे टाळल्यासच कोरोनावर नियंत्रण येणार असल्याचे आरोग्य खात्याने सांगितले.

दरम्यान होम आयसोलेशनचा पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांना उपचाराच्या गोळ्या, आॉक्सीमिटर असे सर्व साहित्य असलेले पॅक घरी पोहोचवले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

Taleigao Election 2024 : ताळगावात सात अपक्षांचे आव्हान; प्रचाराची सांगता

Brazil Hotel Fire: ब्राझीलमधील 3 मजली हॉटेलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी

Loksabha Election Voting : वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी मतदानाची व्यवस्था करा; शॅडो कौन्सिलची मागणी

Panaji News : कामे केल्यानेच भाऊंवर मतदारांचा विश्‍वास : रुडाॅल्फ फर्नांडिस

SCROLL FOR NEXT