Taleigao Election 2024 : ताळगावात सात अपक्षांचे आव्हान; प्रचाराची सांगता

Taleigao Election 2024 : प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने उर्वरित २,३,४,५,७,८ आणि ९ वॉर्डमधील आमदार गटाचे आणि विरोधी ताळगावकर युनाटेडचे उमेदवार प्रचाराला सकाळपासून फिरत होते.
Taleigao Panchayat Election
Taleigao Panchayat Election Dainik Gomantak

Taleigao Election 2024 :

पणजी, ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. अकरा सदस्यसंख्या असलेल्या या पंचायतीच्या चार वॉर्डमधील ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट''चे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

उर्वरित सात जागांसाठी ही निवडणूक होत असून ‘ताळगावकर युनायटेड'' या पॅनलच्या माध्यमातून अपक्ष सात उमेदवारांचे ताळगाव प्रोग्रेसिव्हला आव्हान आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट'' रिंगणात उतरलेली आहे. निवडणुकीचे अर्ज सादरीकरणाच्यावेळीच वॉर्ड दहामधून या फ्रंटचे उमेदवार व्हडलेभाट या वॉर्ड दहामधील सागर बांदेकर याचाच एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाली हे स्पष्ट होते.

त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या वेळी वॉर्ड १ मधून सिद्धी केरकर, वॉर्ड सहामधून इस्टेला डिसोझा आणि वॉर्ड ११ मधून सिडनी बार्रेटो हे तिघे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे सात जागांवर दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले. अकरापैकी सात जागा सत्तेसाठी असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे उर्वरित सातपैकी किती जागा ‘ताळगाव फ्रंट''ला मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने उर्वरित २,३,४,५,७,८ आणि ९ वॉर्डमधील आमदार गटाचे आणि विरोधी ताळगावकर युनाटेडचे उमेदवार प्रचाराला सकाळपासून फिरत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुन्हा-पुन्हा पोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तर दुसरीकडे ताळगावमधील पंचायतीवरील सत्ता आपल्या हातून निसटू नये यासाठी मंत्री व आमदार मोन्सेरात पती-पत्नी दोघेही कधी नव्हे तेवढे फिरत आहेत. सातही जागांवर ‘ताळगाव फ्रंट''चे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले आहेत.

Taleigao Panchayat Election
12 th Result Goa : ऊहापोह बारावीच्या कमी निकालाचा; शिक्षक म्‍हणतात, आम्‍हाला दोष देऊ नका

आजी-माजी भवितव्य...

जानू रुझारिओ आणि आग्नेल डिकुन्हा या आजी-माजी सरपंचांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. या पंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास सुरूवात होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ते संपेल. राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेची सज्जता निर्माणास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com