Panaji News : कामे केल्यानेच भाऊंवर मतदारांचा विश्‍वास : रुडाॅल्फ फर्नांडिस

Panaji News : आम्हाला पूर्ण विश्वास आहे की श्रीपादभाऊ मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak

Panaji News :

पणजी, श्रीपादभाऊ उत्तर गोव्यातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यांनी केलेला विकास लोक पहात आहेत.

त्यांनी कामे केली नसती तर लोकांनी त्यांना सलग पाच वेळा निवडून आणले असते काय ? असा सवाल करीत सांताक्रुझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस म्हणाले की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की श्रीपादभाऊ मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.

सांताक्रुझ मतदार संघातील मेरशी येथे झालेल्या पन्ना प्रमुख संमेलनात फर्नांडिस बोलत होते. त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, जिल्हा पंचायत सदस्य़ गिरीश उसकईकर, मेरशी भाजपा मंडळ अध्यक्ष तथा मेरशीचे सरपंच प्रमोद कामत, सांताक्रुझ भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दयेश वेंगुर्लेकर, पंच सदस्य आणि मोठा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Shripad Naik
Goa Politics: राहुल गांधी तुम्हीच सांगा! विरियातोच्या संविधानाबाबत वक्तव्यवरुन विनोद तावडेंची मागणी

नाईक म्हणले, समाजाचे आणि राष्ट्राचा विचार करणारे संघटन भाजपाने देशाला दिले. समाज व जाज्वल्य देशप्रेम असलेल्या; समाजाप्रती, देशाप्रती आपल्या कर्तव्याचे भान असलेले कार्यकर्ते भाजपला लाभले.

या समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर बनलेले भाजपाचे मजबूत संघटन हे भारताचे भविष्य आहे. नाईक यांच्या सांताक्रुझ प्रचार दौऱ्याची ही दुसरी फेरी होती.

मळा येथे पन्ना प्रमुख संमेलन

त्यानंतर मळा, पणजी येथे आयोजित पन्नाप्रमुख संमेलनाला उपस्थित राहिले. यावेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, उप-महापौर संजीव नाईक, नगरसेवक तथा भाजपा मंडळ अध्यक्ष संजीव देसाई, भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर, पणजी महापालिकेच अन्य नगरसेवक व मोठा प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी सिद्धार्थ कुंकळकर आणि प्रेमानंद म्हांब्रे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com