Captain Viriato Fernandes Vs PM Modi Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', विरियातो म्हणतात खोटं बोलणं मोदींचा स्वभाव

Viriato Fernandes On PM Modi: विरियातो यांच्यावर टीकेची झोड उठत असताना त्यांनी 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', असे स्पष्टीकरण दिले आहे.

Pramod Yadav

Viriato Fernandes On PM Modi

दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या वक्तव्याचे गोव्यात देशभरात पडसाद उमटले. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह देशाचे पंततप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या वक्तव्याची दखल घेतली. विरियातो यांचे वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणारे आहे, असे मोदी छत्तीसगड येथील जाहीर सभेत म्हणाले.

विरियातो यांच्यावर टीकेची झोड उठत असताना त्यांनी 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', असे स्पष्टीकरण दिले आहे.

विरियातो फर्नांडिस यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप विरियातो यांनी केला. गोंयकारपण जपण्याबाबत मी भाष्य केल्याचे, विरियातो म्हणाले.

भाजप म्हणते त्याप्रमाणे गोव्यावर संविधान लादले असे मी बोललो नाही, तर गोमन्तकीयांसोबत चर्चा न करता ते लागू करण्यात आले, असे ते म्हणाल्याचा खुलासा विरियातो यांनी मुलाखतीत केला.

विरियातो यांनी या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचा स्वभावच खोटे बोलणे असून, त्यांच्याशी खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे विरियातो म्हणाले.

दिवस, वेळ आणि ठिकाण ठरावा त्यांच्यासमोर मी काय बोललो याचा व्हिडिओ लावतो. आणि काय असंविधानिक यावर भाजपच्या जाणकारांसोबत चर्चा करण्यास तयार आहे, असे आव्हान विरियातो यांनी दिले.

दरम्यान, विरियातो यांनी मंगळवारी देखील याबाबत वक्तव्य करत चर्चेसाठी तयारी दर्शवली होती. मी फौजी आहे.

मी २६ वर्षे देशाची सेवा केली आहे. त्‍यामुळे संविधानाचे महत्त्व काय, हे मला कुणी भ्रष्‍ट राजकारण्‍याने शिकवण्याची गरज नाही. त्‍या सभेत मी काय बोललो, याचा व्‍हिडिओ आहे. यावर जर मुख्‍यमंत्र्यांना खुली चर्चा करायची असेल, तर त्‍यांनी वेळ आणि जागा ठरवावी. मी तेथे येण्‍यास तयार आहे, असे खुले आव्‍हान काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

SCROLL FOR NEXT