Never before has the word positive held such a negative but this year has also taught us so many things 
गोवा

@२०२० बरेच काही सकारात्मक देऊन गेले !

योगेश दिंडे

पणजी  :  प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘२०२० वर्ष’ सरले. सरलेल्या वर्षातून फक्त आठवणी उरतात. त्यांचा अनुभव उराशी घेऊन भविष्याची आखणी आपण प्रत्येकजण करत आहोत. सरत्या वर्षाने आपल्याकडून बरेच काही हिरावले असेल, पण बरेच काही दिलेही आहे. हे विसरून चालणार नाही. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर जो-तो आयुष्यातून उठला, बेघर, बेरोजगार झाला. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हणतात. याची प्रचिती या काळात प्रत्येकालाच आली. काही सकारात्मक बदलही प्रत्येकाने अनुभवले. 

धावपळ थांबली आणि...

दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गाशी फारच कमी हितगुज साधतो. टाळेबंदीत आपल्या परसबागेतील फुलझाडे, वडिलोपार्जित झाडे घरातल्या मंडळींच्या स्पर्शाने शहारून गेली. आपलेही कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांना आहेच. मात्र ही जाणीव या निमित्ताने अधिक बळकट झाली.वेबिनार, ऑॅनलाईन माध्यमांचा वापर या काळात मोठा वाढला. ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना फार चांगल्याप्रकारे अस्तित्त्‍वात आली. प्रत्येक गोष्टीला पर्याय निर्माण करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. हे वाखाणण्याजोगे आहे. भटजींनी पूजा, धार्मिक विधी मोबाईलच्या माध्यमातून आटोपले. अशा अनेक कितीतरी गोष्टी सकारात्मक घडल्या. त्यामुळे २०२० हे वर्ष सर्वांच्या आयुष्याला वेगवेगळ्या पद्धतीने कलाटणी देणारे ठरले.

मर्यादांची जाणीव!

‘संकटकाळात मदत करतो, तो खरा मित्र’ या सुविचाराचीही खोली प्रत्येकाने अनुभवली. प्रत्येकाला आपल्या मर्यादांची जाणीव झाली. फक्त पैशांनी जग जिंकता येत नाही, याची प्रचिती आली. भाजीपाला, मासळी विक्रीला उधाण आले. मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज, पीपीई किट ढिगाने तयार होऊ लागले. महामारी रोखणाऱ्या संबंधीत उद्योगांचे मोठे अर्थकारण तयार झाले. ‘आजीबाईचा बटवा’ आपल्याकडे होताच, पण या काळात त्याची प्रकर्षाने निकड भासली. आयुर्वेदिक काढा, औषधे यांची प्रत्येक घरात दिमाखात रेलचेल सुरू झाली. एकीकडे हे सर्व सुरू असताना गावाकडच्या जुन्या घरांनी मोकळा श्‍वास घेतला. अनेक वर्षांपासून घरादारांवर साचलेली धूळ, जळमटे त्यांच्या वारसांना नाईलाजाने का होईना स्वच्छ करावी लागली. विदेशात राहणारा आपल्या पोटचा गोळा आपल्‍या अंतिम क्षणी उपस्थित राहील, याचे समाधान मोठ्या बंगल्यातील सुरकुतलेल्या चेहऱ्यांवर दिसले. 

सरकारी जाहिराती आपल्‍याशा वाटू लागल्‍या...

आता प्रत्येकजण स्वच्छतेची दखल घेत आहे. अनेक वर्षांपासून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या सरकारी जाहिराती लोकांना आता आपल्याशा वाटू लागल्या आहेत. असे कितीतरी नवे बदल काहींनी अंगिकारले, काहींना नाईलाजाने अंगिकारावे लागत आहेत. सहनशिलता व मर्यादा यांची जाणीव सर्वांनाच कळाली. विज्ञान-तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, ही बाब या 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT