Pratapsingh Rane Dainik Gomantak 
गोवा

कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा कधीच मागितला नव्हता : प्रतापसिंग राणे

सरकारकडून पत्र मिळाल्यावर विचार करणार असल्याचं राणेंचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाची कधीच मागणी केली नव्हती, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रतापसिंग राणे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जावर पत्रकारांशी बोलताना प्रतापसिंग राणेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. गोवा सरकारने जरी कॅबिनेट दर्जा जाहीर केला असला तरी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

आपल्याला जर आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा सरकारने जाहीर केला असेल, तरीही याबाबत सरकारकडून आपल्याला तशा प्रकारची माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे याबाबत जास्त बोलता येणार नाही. एकदा का याबाबत सरकारचं पत्र मिळालं की त्यावर माझी भूमिका ठरवेन असं प्रतापसिंग राणे म्हणाले आहेत. सरकारकडेच कशाला आपण कुणाकडेच आयुष्यात कसलंही पद मागितलं नसल्याचा दावा प्रतापसिंग राणेंनी (PratapSingh Rane) केला आहे.

दरम्यान पर्ये मतदारसंघातून (Poriem Constituency) अजूनही लढण्यावर आपण ठाम असल्याचा प्रतापसिंग राणे यांनी पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे प्रतापसिंग राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपद देऊन पर्ये मतदारसंघातून विश्वजीत राणेंना उमेदवारी देणाऱ्या भाजपची (BJP) गोची होण्याची दाट शक्यता आहे. अजूनही आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं प्रतापसिंग राणेंनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

SCROLL FOR NEXT