Goa Police Launched Netra CCTV Project
पणजी: राज्यातील सुमारे २५०० हून अधिक सरकारी व खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मॅपिंग ‘नेत्र’ प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज पोलिस मुख्यालयातील कार्यक्रमात करण्यात आले. हा प्रकल्प तपास प्रक्रियेत उपयुक्त ठरणार आहे. तसेच तपासकामाची गतीही वाढवणार आहे, अशी माहिती यावेळी पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.
राज्यातील विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरील खासगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती बीट पोलिसांकडून मिळवून ती नकाशावर नोंद करण्यात आली आहे. हे काम एका महिन्याच्या आत करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत कोणतेही धागेदोरे नसताना गुन्ह्यांचा तपास करताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली होती. त्याचा तपासकामात फायदा झाला आहे.
यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल व सुनीता सावंत तसेच काणकोण उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यांची उपस्थिती होती.
‘नेत्र’ प्रकल्प हा केवळ गुन्हेगारी तपासातच मदत करणार नाही तर वाहतूक नियंत्रण, अपघातप्रतिबंध आणि मालमत्तेचे संरक्षण देखील करणार आहे. प्रकल्प तयार करताना कॅमेरा मालकाची माहिती, संपर्क क्रमांक, डेटा जमा केला जाणार आहे.
गुन्हा केल्यानंतर गुन्हेगारांच्या पळवाटा शोधून त्याला हुडकून काढण्यात मदत झाल्याने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. गुन्हेगारी कमी होईल.अलोक कुमार, पोलिस महासंचालक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.