Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग नितीन गडकरी, भाजपवर लागलेला काळा डाग; सोशल मिडियावर नेटकऱ्यांचा संताप

Pramod Yadav

गेल्या बारा वर्षांपासून अधिककाळ रखडलेला मुंबई गोवा महामार्ग कधी सुरु होणार हा विषय आता एक कोडं बनून राहिला आहे. महामार्गाची दुरावस्था आणि त्याच्या समस्यांबाबत नेटकरी वारंवार पाढा वाचत असतात.

काही दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असून, हा महामार्ग म्हणजे नितीन गडकरी, भाजपवर लागलेला काळा डाग असल्याची प्रतिक्रिया एक नेटकऱ्याने व्यक्त केली आहे.

"मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण येथे नवीन बांधलेल्या बहादुर शेख नाका पुलाच्या मध्यभागी जॉईंटवर अँगलचे होल पास निघाल्यामुळे वरचे काँक्रीट निघून गेले आहे. यामुळे गाड्यांचा अपघात होऊ शकतो", अशी भीती या नेटकऱ्याने व्यक्त केली आहे.

जिथे हायवे तयार नाही तिथल्या सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. रिक्षा, टू व्हीलर ने प्रवास कसा करावा हेच समजत नाही. अनेक ठिकाणी तर हायवेला खड्डे आहेत, अशी व्यथा नेटकऱ्यांनी मांडली आहे.

एका एक्स युझरने महामार्ग २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र, मुदत संपवून आठ वर्षे उलटली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही, असे त्याने म्हटले आहे. महामार्गावर झालेले खड्डे वाहन आणि प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

एका युझरने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुद्दा उपस्थित केला. या कामासाठी दिलेल्या पैशांपैकी अर्धे पैसे देखील मुंबई - गोवा महामार्गासाठी दिले असते तरी कोकणातील लोक आनंदी झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT