Nepal Flood  Dainik Gomantak
गोवा

Nepal Flood: 'गोव्यातील कोणतीही व्यक्ती नेपाळमध्ये अडकलेली नाही'; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

Nepal Flood Missing Persons: नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या महाप्रलयात अनेकजण बेपत्ता किंवा संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या महाप्रलयात अनेकजण बेपत्ता किंवा संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा तिच्याशी संपर्क होत नसल्यास, त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन दक्षिण गोवा पोलिसांनी केले आहे.

बेपत्ता व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, इतर संबंधित माहिती तसेच उपलब्ध असल्यास कुटुंबीय किंवा संपर्क व्यक्तींचे तपशील पोलिसांना द्यावेत. ही माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा खालील हेल्पलाइन क्रमांकांवर कळविता येणार आहे.दक्षिण गोवा जिल्हा नियंत्रण कक्ष : ०८३२-२७९४१००, पीसीआर, दक्षिण गोवा : ७८७५७५६११०, आपत्कालीन हेल्पलाइन : ११२ यावर संपर्क साधावा.

प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यास तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क प्रस्थापित करण्यास मदत होणार असून, नागरिकांनी उपलब्ध माहिती विलंब न करता पोलिस प्रशासनाकडे पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये जी जलप्रलयाची दुर्घटना घडली ती अतिशय दुःखद असून यात आपला जीव गमावलेल्यांप्रती मी श्रद्धांजली व्यक्त करतो. भारतातील अनेक नागरिक येथे गेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच योग्य ती कारवाई करण्यासंबंधी परराष्ट्र मंत्रालय आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे. गोव्यातील कोणतीही व्यक्ती येथे अडकल्याची माहिती सद्यघडीला नाही.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

Viral Video: "तो आमचा हिरो''! स्मित मच्छार यांच्यासाठी इस्त्रायली गायकानं गायली हनुमान चालीसा; यूजर्स म्हणाले, 'अंगावर शहारे आले...'

SCROLL FOR NEXT