monkey Dainik Gomantak
गोवा

निमित्त ठरले माकडाची उडी अन् शेजारी एकमेकांशी भिडले, प्रकरण पोलिसांत; म्हापशात नेमकं काय घडलं?

आफ्रामेंतवाडा-वेर्लात मारामारीनंतर परस्परविरोधी गुन्हा नोंद

दैनिक गोमन्तक

Mapusa News : आफ्रामेंतवाडा, वेर्ला येथे माकडाने झाडावरून घरावर उडी मारल्यामुळे शेजाऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन्ही कुटुंबांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा नोंद केला.

हा प्रकार सोमवारी (ता.३१) सकाळी ८.१५च्या सुमारास घडला. या प्रकरणी संकेत भाईडकर व सोनाली सुतार हे तक्रारदार आहेत. भाईडकर व सुतार कुटुंबामध्ये पूर्ववैमनस्य आहे. भाईडकर यांच्या मालमत्तेतील झाडावरून सुतार यांच्या घरावर एका माकडाने उडी मारली.

यामुळे सुतार यांच्या घराच्या छपरावरील सिमेंट पत्रे फुटले. याचा जाब सुतार मंडळींनी विचारला असता, यावरून दोन्ही कुटुंबामध्ये शिवीगाळ व मारामारी झाली. यामध्ये संकेत भाईडकर व शांबा भाईडकर आणि सोनाली सुतार व भरत सुतार हे चौघे जखमी झाले.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संकेत भाईडकर, स्मृती भाईडकर, सिद्धी भाईडकर, शांबा भाईडकर, लक्ष्मण सुतार, आकाश सुतार, भरत सुतार व सोनाली सुतार यांच्याविरोधात भादंसंच्या ४४७, ३२४, ५०४, ५०६(२) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

झाड कापण्यावरून वाद

यापूर्वी भाईडकर यांच्या मालमत्तेतील एक झाड सुतार यांच्या घरावर कोसळून नुकसान झाले होते. दुर्घटना घडण्यापूर्वी उर्वरित झाड कापावे, अशी सुतार यांची मागणी होती.

मात्र झाड कापले जात नसल्याने दोन्ही कुटुंबीयांमध्ये हा वाद होता. पुढील तपास पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर कांबळी व हवालदार उमेश नाईक हे करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT