Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: शिवोलीत मुलाला फुटबॉलसाठी घेऊन जाणाऱ्या महिलेला कारची धडक, स्थानिकांनी महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांना चोपलं

Mapusa Accident News: बंगळूरमधील सहा पर्यटकांनी भरधाव वेगाने चालवलेल्या इनोव्हा कारने एका ऍक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली

Akshata Chhatre

म्हापसा: म्हापश्यात भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. नियंत्रण सुटलेल्या कारचालकाने महिला आणि तिच्या लहान मुलाला १० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील चालकाला आणि अन्य पर्यटकाला अक्षरश: चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारमधील पर्यटकांनी मद्यपान केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असला तरी प्राथमिक तपासणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. पर्यटकांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवल्याचे समजते.

म्हापशा-शिवोली हाऊसिंग स्लोप येथे बुधवारी दुपारी अपघातामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रातून आलेले सहा पर्यटक एका कारमधून जात होते. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यानंतर घाबरलेल्या चालकाने कारसह तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नादात त्याने एका ट्रकलाही धडक दिली. कार इतकी वेगात होती की कारने दुचाकीला तब्बल दहा मीटरपर्यंत फरफटत नेले.

या घटनेची माहिती समजताच जखमी महिलेचे नातेवाईक आणि अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी कारचालकाला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. तोवर गोवा पोलिसांची पथकही घटनास्थळी पोहोचले आणि पर्यटकांना ताब्यात घेतले.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमा झालेल्या नागरिकांनी पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. हणजूण पोलिसांनी कार चालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

जखमी महिला कोण?

जखमी महिला ही स्थानिक असून ती तिच्या १२ वर्षांच्या मुलाला फुटबॉल मॅचसाठी सोडायला जात होती. या अपघातात दोघेही जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT