Goa Check Post:  Dainik Gomantak
गोवा

Goa Check Post: चेकनाक्यांवर वाहन तपासणीकडे दुर्लक्ष!

पर्वरीतील खून प्रकरणानंतर उघड: पोलिस, वाहतूक, अबकारी कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा

दैनिक गोमन्तक

राज्यातील पोलिस त्यांच्या विविध कारनाम्यांमुळे प्रकाशझोतात राहिले आहेत. भ्रष्टाचारपासून ते त्यांच्या वाईट कृत्यांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे. राज्यातील चेकनाक्यांवर वाहनांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा पर्वरी येथील खुनाचा प्रकरणानंतर उघड झाला आहे. चेकनाक्यावर असलेल्या पोलिस, वाहतूक व अबकारी कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात नाही त्याला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे चेकनाक्यावरील तपासणीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

पर्वरी येथे कामाक्षी उड्डापनोव्ह या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह संशयितांनी वाहनांतून नेऊन आंबोली घाटातील निर्जनस्थळी टाकला होता. मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाला काळ्या काचा होत्या. हे वाहन आंबोलीपर्यंत जाताना वाटेत पेडण्यातील न्हयबाग व मोपा तसेच पत्रादेवी हे तीन चेकनाके लागतात, मात्र तिन्ही ठिकाणी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली नाही, तसेच वाहनाला काळ्या काचा असूनही त्याविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही.

या ठिकाणी वाहतूक कर्मचारी तसेच अबकारी कर्मचारी असतात, त्यांनीही या वाहनाची तपासणी केली नसल्याने पोलिस, वाहतूक व अबकारी कर्मचाऱ्यांच्या या चेकनाक्यावरील तपासणीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांना मोकळीक मिळत आहे. गुन्हा करून गोव्याबाहेर जाण्यासाठी गुन्हेगारांना हे मोकळे रान बनले आहे. चेकनाक्यावरील तपासणीची गंभीरता राहिलेली नाही.

या चेकनाक्यावरून मालाच्या वाहनांचीच तपासणी केली जाते. इतर चारचाकी वाहनांची तपासणी केली जात नाही. पर्यटकांच्या वाहनांची तपासणीच्या नावाखाली सतावणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत असतात. गोव्यातील वाहनांची तपासणी केली जात नाही मात्र वाहन इतर राज्यातील असल्यास या चेकनाक्यावरील पोलिस वाहनाच्या दस्तऐवजाची तपासणी करतात.

तपासणी केली तरी आरोप होतात त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच या तपासणीबाबत संयम बाळगण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे तपासणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्यावेळी चेकनाक्यावर वाहनांच्या काचा काळ्या आहेत की नाहीत याचा अंदाज येत नाही व त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काही विशिष्ट माहिती असल्यासच चेकनाक्यावर वाहनांची तपासणी अचानक केली जाते.

काळ्या काचा असूनही ‘त्या’ वाहनाकडे दुर्लक्ष

कामाक्षी हिच्या मृतदेहाची आंबोली घाटात विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनाला काळ्या काचा होत्या. वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वचक बसावी म्हणून मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. काळ्या काचा असलेल्या वाहन चालकाला वचक बसावा, म्हणून दंडात्मक कारवाई १०० रुपयांवरून २ हजार रुपये करण्यात आली आहे.

काळ्या काचा असलेली अलिशान व किमती वाहने रात्रीच्यावेळी अधिक तर रस्त्यावर दिसतात. काहीवेळा ती दिवसाही दिसतात. मात्र त्याविरुद्ध कारवाईचे पोलिसांना धाडस होत नाही. किंमती वाहन वापरणाऱ्या व्यक्ती या वजनदार असण्याची तसेच त्यांचे राजकारण्यांशी लागेबांधे असू शकतात, त्यामुळे रस्त्यावर कारवाईस उभे असलेले पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात, असे मत एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT