Rose Garden Panaji Dainik Gomantak
गोवा

Rose Garden Panaji: कोट्यवधी खर्च करून उभारले 'रोझ गार्डन', गुलाब कधी उमललेच नाहीत; पणजीतील उद्यानाच्या उद्देशालाच हरताळ

Salvador Souza Rose Garden Panaji: माजी खासदार शांताराम नाईक यांनी या ठिकाणी गुलाबाचे उद्यान उभारण्याचा संकल्प सोडला होता, परंतु नावात फक्त ‘रोझ’ म्हणून उल्लेख राहिला.

Sameer Panditrao

पणजी: शहरातील गीता बेकरीसमोरील ‘साल्वादोर सौझा - रोझ गार्डन’ या ‘रोझ गार्डन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उद्यानात गुलाबाची फुले कधी फुललीच नाहीत. मात्र, या उद्यानाचा वापर गैरप्रकार आणि भिकाऱ्यांना झोपण्यासाठी होत असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या उद्यानाचा उद्देश खरोखरच सफल झाला आहे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विठ्ठल चोपडेकर महापौर असताना या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. खऱ्या अर्थाने हे उद्यान उभारण्यासाठी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पुढाकार घेतला होता. माजी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण झाले. पाण्याच्या दाबावर फिरणारा गोलाकृत दगड या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे.

या गोलाकृत दगडाभोवती रंगीबेरंगी कारंजाही उभारण्यात आला. मोजून काही दिवस कारंजे चालले असतील, परंतु त्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी आणि चारही बाजूने वाहनांच्या गोंगाटामुळे उद्यानात येऊन बसण्याकडे नागरिकांचा फारसा कल राहिला नाही.

माजी खासदार शांताराम नाईक यांनी या ठिकाणी गुलाबाचे उद्यान उभारण्याचा संकल्प सोडला होता, परंतु नावात फक्त ‘रोझ’ म्हणून उल्लेख राहिला. इतर ठिकाणी गुलाबाची काही रोपट्यांची लागवड दिसून आली. पूर्णपणे गुलाबांचे उद्यान उभारण्याचा संकल्प मागे राहिला.

उद्यानाचा मूळ उद्देश असफल

हे उद्यान उभारण्यामागचा मूळ उद्देश खरोखरच सफल झाला आहे का? याचे उत्तर महानगरपालिकेलाही सापडणार नाही. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जलधाराची सजावट करण्यात आली, पण हा सर्व खर्च अनाठायी झाला आहे, असे कोणताही नागरिक सांगू शकतो.

‘उत्सव, सणापुरतीच स्वच्छता’

एका नगरसेवकाने नाव न घेता ‘गोमन्तक’ला सांगितले की, उद्यानाची निगा राखण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. उत्सव, सण किंवा महत्त्वाचा दिवस असला की उद्यानाची तेवढ्यापुरती स्वच्छता केली जाते. ज्या नगरसेवकांनी हे उद्यान उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता, ते नगरसेवक तरी या उद्यानात येतात काय? असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT