NEET Entrance Exam Dainik Gomantak
गोवा

NEET Exams: गोव्यात आयुर्वेदसाठी १०० जागा तर १४ सप्टेंबर पासून अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची दुसरी फेरी सुरु...

Goa Ayurvedic Entrance Exams: गोव्यात NEET-आधारित पदवी कार्यक्रमाच्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी १६ ते १८ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim,Goa

पणजी: गोव्यात NEET-आधारित पदवी कार्यक्रमांच्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी १६ ते १८ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.

गोव्यातील दोन्ही आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये १०० जागा उपलब्ध असून, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) या नवीन उभारलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये ५० टक्के जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातील.

आयुर्वेद पदवी कार्यक्रमाव्यतिरिक्त, गोव्यात नर्सिंग आणि पाच पॅरामेडिकल कार्यक्रमांमध्ये काही जागा रिक्त आहेत जिथे दुसऱ्या फेरी दरम्यान प्रवेश मिळवला जाऊ शकतो.

तरीही जागा रिक्त राहिल्यास NEET-आधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑक्टोबरमध्ये आणखी फेऱ्या घेतल्या जातील अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (DTE) अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा १४ सप्टेंबर पासून:

अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रमाच्या जागांसाठी प्रवेशाची पुढील फेरी १३ सप्टेंबर रोजी घेतली जाईल,तर पदवी कार्यक्रमासाठी १४ सप्टेंबर रोजी फेरी घेतली जाणार आहे.

प्रवेशाच्या या फेरीदरम्यान जे विद्यार्थी NEET परीक्षा देऊ शकले नाही ते कोणत्याही उपलब्ध अभियांत्रिकी जागेसाठी प्रवेश मिळवू शकतील.

गोव्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १,५०० हून अधिक जागांच्या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर जवळपास 400 जागा रिक्त राहिल्या असल्याने DTE ने JEE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज भरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) प्रवेशासाठी निर्धारित केलेल्या निकषांची पालन करणे महत्वाचे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT