Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: गोव्याला भाजपमुक्त करण्याची गरज, फातोर्डा येथून मोहिमेची सुरुवात; विजय सरदेसाई

Vijai Sardesai: राज्यांना दिल्लीश्‍वराच्या सक्तीचा सामना करावा लागतो, केंद्राचा हा दबाव योग्य नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी स्वातंत्र्यदिनी फातोर्डा येथील निवासस्थानी तिरंगा फडकवला. यावेळी सरदेसाई यांनी भाजपपासून गोव्याला मुक्त करण्याची मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त केली. फातोर्डा येथून या मोहिमेची सुरुवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मॉडेल मडगाव पॅनलचे नगरसेवकही हजर होते. या कार्यक्रमाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई आणि अॅड. अश्मा बी, सरचिटणीस प्रशांत नाईक, सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत, पालिकेचे नगरसेवक निमिशा फालेरो, फ्रान्सिस जोनास, जॉनी कास्ट्रो, मॉडेल मडगाव पॅनलचे नगरसेवक सिद्धांत गडेकर, घनश्याम शिरोडकर तसेच माजी नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई यांच्यासह इतर सदस्य, पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

सरदेसाई यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यसैनिकांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. त्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांना आदरांजली वाहिली, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या ऐतिहासिक व्यक्तींना इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल सरदेसाई यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी आज भारत खरोखरच स्वतंत्र आहे का, असा सवाल केला.

केंद्राचा दबाव

सरदेसाई पुढे म्हणाले, आर्थिक स्वातंत्र्य तसेच राज्यांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत राज्यांना दिल्लीश्‍वराच्या सक्तीचा सामना करावा लागतो. केंद्राचा हा दबाव योग्य नाही. राज्यांनाही स्वातंत्र्य हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

Cash For Job Scam: सरकारी नोकऱ्यांची विक्री म्हणजे गोव्याला झालेले 'गँगरीन'; आता 'बड्या' माशांचे काय? संपादकीय

Cash For Job Scam: सागर नाईकविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद; 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT