Goa Panchayat Elections News | Goa election Latest News Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार पंचायत निवडणुका

क्लायड क्रास्टो: व्यक्तिगत स्वरूपात पक्ष संबंधित उमेदवारांना पाठिंबा

दैनिक गोमन्तक

पणजी: राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात येऊ घातलेल्या पंचायती निवडणुकीमध्ये सहभागी होईल. मात्र, पक्षीय स्वरूपात न होता व्यक्तिगत स्वरूपात पक्ष संबंधित उमेदवारांना पाठिंबा देईल अशी माहिती पक्षाचे निरीक्षक आणि सहप्रभारी क्लायड क्रास्टो यांनी दिली.

पणजीच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रवक्ते अविनाश भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर सक्रिय केल्याची घोषणा त्यांनी केली. (Goa Panchayat Elections News Updates)

सध्याच्या कोरोनाच्या काळात सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सोशल मीडिया प्लॉटफॉर्मवर सक्रिय करण्याचा निर्णय घेतला असून गोवा राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर असेल असे क्लायड क्रास्टो म्हणाले.

क्रास्टो म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आपण एका विचित्र मानसिकतेमधून जात आहोत. मात्र, या काळात सोशल मीडियाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. म्हणूनच पक्ष आता सोशल मीडियावर सक्रिय असेल. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारूनही भाजपने पाठीमागच्या दारांना सत्ता मिळवली. देशभर त्यांचे असे संविधानात्मक रीतीने सत्ता मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर येत राहू. राज्यात येऊ घातलेल्या पंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पंचायतीमधील त्या-त्या प्रभागांमधून व्यक्तीगत पातळीवर पक्ष पाठिंबा देईल, असेही क्लायड क्रास्टो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team Fixing: यांना लाज कशी वाटत नाही? पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप! PCB ने सुरु केली चौकशी

Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

SCROLL FOR NEXT