Marathi Konkani New Textbooks Canva
गोवा

Goa Education: गोव्यात मराठी, कोकणीसाठी नवी पुस्तके! शिक्षण धोरणानुसार बदल; उपक्रम, प्रकल्पांवर अधिक भर

Marathi Konkani New Textbooks: राज्यात गेल्यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला सुरवात करण्यात आली. त्याअनुषंगाने राज्यातील पाठ्यपुस्तकांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये बदल केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Marathi Konkani New Textbooks For Goa

गंगाराम आवणे

पणजी: राज्यात गेल्यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला सुरवात करण्यात आली. त्याअनुषंगाने राज्यातील पाठ्यपुस्तकांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये बदल केला जात आहे. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांचे काम गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदतेतील (एसीईआरटी) विविध विषयांच्या समित्या करत आहेत. त्यांना एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत मार्गदर्शनही केले आहे.

मराठी आणि कोकणी विषय वगळता इतर विषयांची एनसीईआरटीने तयार केलेल्या पुस्तकांमध्ये २० टक्के स्थानिक विषयांचा समावेश करून पुस्तके तयार केली जातील, परंतु मराठी आणि कोकणीसाठी पूर्णतः नवी पुस्तके एसीईआरटीच्या मराठी आणि कोकणी विषय समित्या करत आहेत.

मराठी विषयाच्या अनुषंगाने इयत्ता पहिली, तिसरी आणि सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीला सुरवात झाली आहे. जी पूर्णतः एससीईआरटीचे विषय समिती तयार करत असल्याचे पायाभूत (फाऊंडेशन) स्तराच्या अभ्याक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे आता पुस्तक वाचून विद्यार्थ्यांना शिकविणे एवढ्यापुरते शिक्षण मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, प्रकल्प करावे लागतील. कोकणी पुस्तक पूर्णतः येथील समितींकडून बनविण्यात येत आहे, परंतु आम्ही एनसीईआरटीची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांचे पालन करून ही पुस्तके बनविण्यात येत असल्याचे कोकणी विषय समितीचे पदाधिकारी तसेच गोवा विद्यापीठातील कोकणीचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पर्येकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मिळणार आनंद

मुलांच्या क्षमता विकसित करणे हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पूर्वी पुस्तक निर्मिती करताना धडे आणि त्यांचे प्रश्‍न असा अभ्यासक्रम असायचा, परंतु आता स्वाध्याय, प्रकल्प आदी विषयांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवेल, आनंद देईल असा अभ्यासक्रम बनविण्यात येत आहे, असे प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले.

राज्यात एनईपीच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. यासाठी फाऊंडेशन, प्रिपरेटरी आणि मीडल अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या समितींना प्रशिक्षण देण्यात आले. मराठी आणि कोकणी विषयाची पूर्णतः नवी पुस्तके एससीईआरटीच्याच समित्या तयार करणार आहेत.
-मेघना शेटगावकर, संचालक, एससीईआरटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT