Navratri festival started Dainik Gomantak
गोवा

Navratri Festival : मुरगाव तालुक्यात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर अनेक मंदिरांच्या भागांमध्ये लगबग वाढली

दैनिक गोमन्तक

वास्को: राज्यात आज दिनांक 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सर्वत्र देवींच्या मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यामूळे मुरगाव तालुक्यात नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. विविध ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त सभा मंडप उभारण्यात आले आहे. आता नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.

मुरगाव तालुक्यात वास्कोत नवेवाडे, चिखली, मांगुरहिल, बायणा, सडा आधी भागात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली. आज पहिल्याच दिवशी घटस्थापना झाल्यानंतर अनेक मंदिरांमध्ये विविध प्रकारचे धान्य रुजवण्यात घातले. नवव्या दिवशी ते काढून सोने म्हणून वाटले जाते. आजपासून नऊ दिवस स्थानिक कलाकारांचे मंदिरात भजन, तसेच कीर्तनाला सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच मंडळे स्थापन करून मोठ्या मंडपात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये दांडिया अर्थात गरबा नृत्य मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे या दांडिया नृत्यांना ब्रेक पडला होता. तो आजपासून अनुभवयास मिळाला. येथील प्रत्येक मंदिरात दररोज नऊ दिवस दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दांडिया गरबा नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

मुरगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक मंडळ हेडलँड सडा वर्ष पद्धतीप्रमाणे सड्यावरील कलावती आई मंदिरासमोर पटांगणात नवरात्रोत्सव काळात 26 सप्टेंबर ते बुधवार दि.5 ऑक्टोंबर पर्यंत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षपद्धतीप्रमाणे नवरात्रोत्सव सोमवार दि. 26/9 /2022 ते बुधवार दि. 5/10 /2022 पर्यंत सड्यावरील कलावती आई मंदिरासमोरील पटांगणात नवरात्रोत्सव विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT