navratri celebration Dainik Gomamtak
गोवा

Navratri celebration in Goa राज्यात भजन-कीर्तन-फुगडी-गरबा कार्यक्रमांचा उत्साह

१९ रोजी वांते ग्रामस्थातर्फे रात्री ८ वाजता फुगडी व आरती होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri celebration in Goa वाळपई, गावकरवाडा-वांते येथील श्री सातेरी-केळबाई देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ रोजी नीलेश वळवईकर, प्रतीक देसाई, दिगंबर गावस या कलाकारांसमवेत श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, गुळेली यांच्यातर्फे भजन सादर करण्यात येईल. १९ रोजी वांते ग्रामस्थातर्फे रात्री ८ वाजता फुगडी व आरती होईल.

२० रोजी नितीन शिवडकर यांच्यातर्फे साई पूर्वा आर्ट करमळी यांच्या वतीने नटसम्राट नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. २१ रोजी संध्याकाळी ६ वा. मुलांसाठी बडबड गीत स्पर्धा, बालगीत स्पर्धा, रात्री ८ वा. कीर्तनकार गायत्री कदम यांचे कीर्तन होणार आहे.

हा कार्यक्रम सरपंच उदयसिंग राणे, सुभाष गावडे यांनी कार्यक्रम पुरस्कृत केला आहे. २२ रोजी संध्याकाळी ७ वा. दांडिया व रात्री ८.३० वा. महामाया आरती मंडळ शिरोडा यांच्या वतीने घुमट आरती स्पर्धा होईल.

२३ रोजी रात्री ७.३० वा. सातरी कला मंच सत्तरी यांच्यातर्फे रंग मांड, समई नृत्य, मुसळ नृत्य, कुणबी फुगडी आयोजित केली आहे. त्यानंतर ‘कोलो भागो’ हा नाट्यप्रयोग सातेरी सत्पुरुष सेल्फ हेल्प ग्रुप, गावकरवाडा वांते यांच्यातर्फे आयोजित केला आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त होंडा येथे फुगडी स्पर्धा

पिसुर्ले, ता. १७ (वार्ताहर) : होंडा येथे जय मातादी उत्सव समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ रोजी रात्री आठ वाजता सत्तरी तालुका मर्यादित फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

१९ रोजी रात्री आठ वा. जादुगार सादिक यांचा जादूचा कार्यक्रम होणार आहे. ता. २० रोजी रात्री आठ वा. काराओके गीत गायन स्पर्धा होणार आहे. ता. २१ रोजी रात्री आठ वा. अखिल गोवा पातळीवर एकेरी नृत्य स्पर्धा होईल. २२ रोजी ‘द गोवन मेलोडिज’ ऑर्केस्ट्रा होणार आहे.

२३ रोजी सकाळी ११ वा. भंडारा, तर संध्याकाळी साडेसात वाजता आमंत्रित मंडळांचा दांडिया कार्यक्रम होणार आहे.

महामाया कालिका संस्थान कासारपाल येथे मखरोत्सव

मये, महामाया कालिका संस्थान कासारपाल-डिचोली येथे १५ ते २४ दरम्यान विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

महाजनपद म्हापसा येथील दीपक कमलाकांत शिरोडकर (चाती) आणि दीपश्री शिरोडकर यांना लाभले आहे. १८ रोजी सायंकाळी ७ वाजता शांतादुर्गा भजनी मंडळातर्फे भजनी कार्यक्रम होतील. १९ रोजी ललिता पंचमी होईल.

पुराण वाचनानंतर पुणे येथील हर्षदबुवा जोगळेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यांना हार्मोनियमवर आनंद रायकर आणि तबल्यावर प्रसन्न साळकर साथसंगत करणार आहेत. रात्री ९ वाजता मखरोत्सव होईल.

हा मखरोत्सव २३ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. २० रोजी सायंकाळी ७ वाजता पुराण, कीर्तन व मखरोत्सव होईल. २१ रोजी दुपारी ४ वाजता ज्ञानेश्वरी गुरुदत्त महिला मंडळ, मडगावतर्फे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण, अभंग व भक्तिगीत कार्यक्रम, पुराण वाचन, कीर्तन आणि मखरोत्सव होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: राज्यात रस्ते अपघातात वाढ, 2022 पासून आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly Live: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

Video: रेल्वे ट्रॅकवर धावली व्हॅन! जुगाड पाहून तुम्हीही व्हाल हैराण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT