Goa Assembly Live: गणेश चतुर्थीपूर्वी पावसामुळे कोसळलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम

Goa Assembly Monsoon Session 2025: गोव्यातील पावसाळी अधिवेशनाबद्दल अपडेट्स, राजकारण आणि इतर घडामोडी.
 Goa Vidhan Sabha Monsoon Session
Goa Vidhan Sabha Monsoon SessionDainik Gomantak

गणेश चतुर्थीपूर्वी पावसामुळे कोसळलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम

पार्से येथे मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण होणार. आमदार जीत आरोलकर यांचे आश्वासन.

केपे मतदारसंघात ३५ टक्के घरांना शौचालये नाहीत

राज्य सरकारने राज्य हागणदारीमुक्त जाहीर केले असले तरी केपे मतदारसंघात ३५ टक्के घरांना शौचालये नाहीत: आमदार एल्टन डिकॉस्ता

सांडपाणी विल्हेवाटीसाठी केवळ गडद पिवळा रंग वापरावा

जनतेने केवळ गडद पिवळा रंग असलेल्या टॅंकरांचाच वापर सांडपाणी विल्हेवाटीसाठी करावा. अन्य रंगाचे टॅंकर सरकारकडे नोंद नाहीत याची नोंद घ्यावी: मुख्यमंत्री

साखळी नगरपालिका देणार विशेष मुलांना रोजगार अनुभवाची संधी

साखळी नगरपालिका क्षेत्रातील विशेष मुलांना साखळी नगरपालिका वर्षाला एक याप्रमाणे एप्रेंटिशीप रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यात त्यांना ठराविक मानधन व अनुभवाचा दाखला देणार. या उपक्रमातून या विशेष मुलांमध्ये रोजगाराचा आत्मविश्वास निर्माण होणार - नगराध्यक्षा सिध्दी प्रभू. नगरपालिका बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला निर्णय

महाराष्ट्रीयन ३.५० लाख देऊन बनतात पोस्टमन!

  • गोव्यात नियुक्ती झालेल्या महाराष्ट्रातील पोस्टमन्सकडून ३.५० लाख रुपये देऊन नोकरी मिळवल्याच्या आमदार विजय सरदेसाईंचा सभागृहात दावा. गोव्याची माहिती नसल्याने पत्रे लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचेही केले स्पष्ट.

  • ज्यांना कोकणी समजते त्यांनाच गोव्यात पोस्टमनच्या नोकर्‍या देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पाण्यासाठी उत्तर-दक्षिण गोव्यात पेटणार वाद!

  • म्हादई नदीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर आतापर्यंत १६ कोटींचा खर्च. कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवत असतानाही सरकार गप्प बसले आहे. यामुळे पाण्यासाठी भविष्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जनतेतही पेटणार वाद : युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

  • सभागृहात म्हादईवरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजं

कालव्यांच्या बाजूची १५ लाख चौरस मीटर जमीन आणणार लागवडीखाली!

  • तिलारीतून गोव्यात येणार्‍या कालव्यांच्या बाजूची सुमारे १५ लाख चौरस मीटर पडीक जमीन आम्ही कसण्यासाठी घेतली. मयेतील ७०० एकर जमीन लागवडीखाली आणण्यासाठी ३५ कोटी खर्चाची तरतूद : सुभाष शिरोडकर, मंत्री, जलस्रोत

  • विरोधी पक्षनेते युरी आलेमाव य‍ांच्या प्रश्नावर उत्तर

स्वातंत्र्यसैनिक‍ांच्या मुलांना माझ्या काळात सर्वाधिक सरकारी नोकर्‍या!

  • माझ्या मुख्यमंत्रिपद‍ाच्या काळात आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या २३६ मुलांना सरकारी नोकर्‍या मिळाल्या. त्याआधी १९६ जणांनाच मिळाल्या होत्या नोकर्‍या. सध्या केवळ २५ जणच उरलेत : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

  • अर्ज केलेल्या २०२ जणांना अजून नोकर्‍या न मिळाल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा दावा.

"दिशाभूल करू नका, मुख्यमंत्री म्हणून तूच काम केलं का?" युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा दुसऱ्या दिवशी अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांना टोला.

उर्मिला गावकर यांना नविन घराचे आश्वासन; आमदार देविया राणे यांची तत्काळ दखल

नानेली-सत्तरी येथील उर्मिला गावकर यांच्या घराची भिंत सोमवारी मुसळधार पावसामुळे कोसळली. तसेच घराचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत आहे. गोमन्तक टीव्हीने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आमदार देविया राणे यांनी दखल घेत स्व खर्चाने उर्मिला गावकर यांना नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे

"माझ्यासाठी प्रत्येक आमदार महत्त्वाचा" सभापती

"माझ्यासाठी प्रत्येक आमदार महत्त्वाचा आहे, मग तो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधारी पक्षाचा. मी फरक करत नाही," असे विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून विचारले जाणारे बहुतेक प्रश्न विचारले असता सभापती रमेश तवडकर म्हणाले.

२.२१ लाख किमतीच्या गांजासह एकाला अटक

सोमवारी संध्याकाळी वेर्णा येथील पिरनी सर्कल बस स्टॉपच्या मागे वेर्णा पोलिसांनी अमली पदार्थांवर छापा टाकला आणि राहुल कुमार केरवट (वय २८, रहिवासी वेर्णा आणि मूळ मध्य प्रदेश) याला २.२ किलो गांजा जप्त केल्याबद्दल अटक केली, ज्याची किंमत २.२१३ लाख रुपये आहे.

तांत्रिक बिघाडानंतर गोव्याहून इंडिगोचे विमान इंदूरमध्ये सुरक्षितपणे उतरले

२१ जुलै २०२५ रोजी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (दाबोळी) वरून इंदूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६E ८१३ मध्ये लँडिंगपूर्वी तांत्रिक बिघाड झाला. विमान इंदूरमध्ये सुरक्षितपणे उतरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com