Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नावेली दरोडा कट प्रकरणी दोघांना अटक; सात दिवस पोलिस कोठडी

Navelim Theft Plan: २७ जुलै रोजी हा दरोड्याचा कट रचला होता; दुकानात ग्राहकांची गर्दी असल्यामुळे हा कट फसला होता

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, ता. १० (खास प्रतिनिधी) : नावेली येथील एका सराफी दुकानावर दरोडा घालण्याचा कट रचलेल्या दोघांना आज मडगाव पोलिसांनी अटक केली. २७ जुलै रोजी हा दरोड्याचा कट रचला होता; पण दुकानात ग्राहकांची गर्दी असल्यामुळे हा कट फसला होता.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गोवर्धन सिंग आणि शामलाल मेघावल या दोन मूळ राजस्थानी संशयितांना आपल्या ताब्यात घेतले तर कुळे पोलिसांनी अटक केलेल्या लाडू सिंग यालाही ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सात दिवसc ठेवण्याचा रिमांड मंजूर केला.

ही टोळी दरोडा टाकण्यासाठी मडगाव येथे आली होती; पण प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर ते परत कर्नाटकात जात असताना सीमेवरील पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तुले सापडल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एका राजस्थानी व्यक्तीच्या सांगण्यावरून मडगाव येथे दरोडा घालण्यासाठी आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

SCROLL FOR NEXT