Navelim Panchayat Dainik Gomantak
गोवा

Navelim Panchayat: सखल भागात बांधकाम नको! नावेली पंचायत आक्रमक; 'बीडीओ'च्या विरोधात बंडाची तयारी

Navelim Panchayat Protest BDO: रातवाडो, नावेली येथील सखल भागातील प्रस्तावित बांधकाम प्रकल्पावरुन नावेली पंचायत, सासष्टी गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: रातवाडो, नावेली येथील सखल भागातील प्रस्तावित बांधकाम प्रकल्पावरुन नावेली पंचायत, सासष्टी गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे. नावेली पंचायतीची खास बैठक झाली व यात या बांधकाम तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिथे हे प्रस्तावित बांधकाम प्रकल्प उभारला जाणार आहे, तो सखल भाग आहे. शिवाय त्या भागात सहा मीटर रुंदीचा रस्ता नाही. शिवाय त्या भागातून नाला वाहत आहे. जर बांधकाम आले तर नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबणार, अशी कारणे देऊन पंचायतीने या प्रकल्पाला विरोध केला व तसा अहवाल तयार करून संबंधीत सरकारी खात्यांना पाठवला.

मात्र, १ एप्रिल रोजी गट विकास अधिकाऱ्यांनी नावेली पंचायत सचिवाला या बांधकाम प्रकल्पाला परवाना तीन दिवसांत द्यावा, असा आदेश दिला आहे. जर आदेशाचे पालन केले नाही, तर सचिवावर कारवाई केली जाणार असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे सरपंच पॉल परेरा यांनी पत्रकारांना सांगितले.

या विषयावर चर्चेसाठी पंचायतीची खास बैठक आज बोलावण्यात आली व आम्ही लोकांसोबत आहोत व आम्हाला हा प्रकल्प कुठल्याही स्थितीत नको. जर बळजबरीने सरकारने या प्रस्तावित बांधकामाला परवानगी दिली तर सर्व थरातून त्यास विरोध केला जाईल शिवाय न्यायालयीन लढाईसाठी पंचायत तयार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही सरपंचांनी स्पष्ट केले.

पंचायत व ग्रामसभेचा निर्णय अव्हेरून या बांधकामाला परवाना देण्यास सचिवावर दबाव आणण्याचा अधिकार गट विकास अधिकाऱ्याला आहे का असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला, असे स्थानिक पंच वियेना ब्रागांझा यांनी सांगितले.

हेराल्ड पिंटो या नागरिकाने सांगितले की, कुठल्याही बांधकामासाठी सहा मीटरचा रस्ता बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले असताना या प्रकल्पाला मान्यता कशी काय द्यायची हा प्रश्‍न आहे.

ज्या ज्या संबंधित सरकारी खात्यांनी या बांधकामाला परवाने दिले आहेत, त्या खात्यातील अधिकाऱ्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी पिंटो यांनी केली. आम्ही कुठल्याही परिस्थिती या प्रकल्पा विरोधात आवाज उठवणार आहोत असे त्याने स्पष्ट केले.

समिती झाल्यावर सीसीटीव्ही बसवू!

बैठकीत पंचायत परिसरातील सीसीटीव्ही बद्दलचा विषय चर्चेला आला. या संदर्भात बोलताना सरपंच पॉल परेरा यांनी सांगितले की, सीसीटीव्ही साठी ग्रामसभेच्या ठरावानुसार समिती नियुक्त करणे आवश्यक आहे. समिती नियुक्त करण्याचे काम चालू आहे व एकदा समिती ठरली की, मग सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला चालना मिळेल, असे सरपंचांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

SCROLL FOR NEXT