Navelim Fire Dainik Gomantak
गोवा

Navelim Fire: नावेलीत बंगल्याच्या पार्किंगला भीषण आग; BMWसह तीन वाहने जळून खाक, एक कोटी रुपयांची हानी

Navelim Vehicle Fire: नावेली येथे एका बंगल्याच्या तळमजल्यावरील वाहन पार्किंगच्या जागेला आग लागून तीन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर एका वाहनाला थोडीशी आगीची झळ बसली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: नावेली येथे एका बंगल्याच्या तळमजल्यावरील वाहन पार्किंगच्या जागेला आग लागून तीन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर एका वाहनाला थोडीशी आगीची झळ बसली. आगीत जळालेल्या वाहनांमध्ये एक ‘बीएमडब्ल्यू’, एक कार व दुचाकीचा समावेश आहे.

तर एका जीपच्या पुढच्या भागाला आगीची झळ बसली, अशी माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांनी दिली. गुरुवारी (ता.२७) सायंकाळी ६ वा.च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सायमन रिबेलो यांच्या मालकीचा हा बंगला आहे.

नुकसानीचा नेमका आकडा अजूनही कळू शकला नसला तरी सुमारे एक कोटी रुपयांची हानी झाली असावी, अशी माहिती दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. आगीचे नेमके कारणही स्पष्ट झाले नाही. आग विझविण्यासाठी एका बंबाचा वापर करण्यात आला. मडगाव पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणीकेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

Gas Leak Fire Incident: गॅस गळतीने घरात आगीचा भडका; गोव्यात मायलेकी होरपळल्या, गोमेकॉत उपचार सुरू

Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

SCROLL FOR NEXT