Nave Utsav Mayem Dainik Gomantak
गोवा

Nave Utsav: ४०० वर्षांची परंपरा लाभलेला 'नवे उत्सव' उत्साहात साजरा! मये, वायंगिणी आणि डिचोली ग्रामस्थांचा सहभाग

Goa Nave Utsav: मयेसह वायंगिणी आणि डिचोली या तीन गावांशी संबंध असलेल्या या उत्सवाला किमान ४०० वर्षांची परंपरा आहे. भातशेती पिकून तयार झाल्यानंतर पहिले कणीस ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी अर्पण करण्याचा उत्सव म्हणजेच मये गावातील प्रसिद्ध ‘नवे उत्सव’.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Nave Utsav 2024

डिचोली: शेकडो वर्षांची परंपरा आणि तीन गावांशी संबंधित असलेला मये गावातील प्रसिद्ध ‘नवे उत्सव’ रविवारी (ता. ६) परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मयेसह वायंगिणी आणि डिचोली या तीन गावांशी संबंध असलेल्या या उत्सवाला किमान ४०० वर्षांची परंपरा आहे.

भातशेती पिकून तयार झाल्यानंतर पहिले कणीस ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी अर्पण करण्याचा उत्सव म्हणजेच मये गावातील प्रसिद्ध ‘नवे उत्सव’. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात साजरा होणाऱ्या या उत्सवाला इतर उत्सवांप्रमाणेच एक वेगळे महत्त्व आहे. भातशेती पिकल्यानंतर नवे केल्याशिवाय गावात भातकापणी केली जात नाही.

मये, डिचोली (Bicholim) आणि वायंगिणी या तिन्‍ही गावांचे ‘नवे’ श्री महामाया देवीच्या प्रांगणात केले जाते. गावकरवाडा येथे ग्रामदेवता श्री महामाया देवीच्या प्रांगणात भाविक मोठ्या संख्‍येने जमतात. येथून मग सर्वजण वाजतगाजत पारंपरिक भातशेतीच्या स्थानी येतात. त्यानंतर शेतीची विडा वाहून विधिवत पूजा केली जाते.

कणसांच्या दाण्यांच्‍या खिचडीचा प्रसाद

मंदिरात आल्यानंतर सर्व कणसे देवीच्या पुढे ठेवून त्यांची विधिवत पूजा केली जाते. नंतर वायांगिणी आणि डिचोली येथील भाविक वाजतगाजत कणसे आपल्या गावात घेऊन जातात. तर मयेतील सर्वजण ‘नवे’ अर्थात कापलेली कणसे आपापल्या घरी घेऊन जातात. या कणसांची पूजा करून आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर बांधतात. तसेच कणसांच्या थोड्या दाण्यांची खिचडी करून प्रसाद म्हणून खातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa Today's News Live: साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

SCROLL FOR NEXT