Mayem: पावसाच्या नुकसानीनंतर आधुनिक 'ट्रान्स्प्लांटेशनद्वारे' तरव्याची रोपणी

Mayem Farmer Transplanting Project: ट्रान्सप्लांटेशन म्हणजे तयार झालेल्या तरव्याची यंत्राद्वारे लागवड करण्यात येते
Mayem Farmer Transplanting Project: ट्रान्सप्लांटेशन म्हणजे तयार झालेल्या तरव्याची यंत्राद्वारे लागवड करण्यात येते
Mayem Farmer Transplanting ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाच्या तडाख्यात तरव्याची नासधूस झाल्यानंतर मयेतील शेतकऱ्यांनी आता ‘ट्रान्सप्लांटेशन’द्वारे तरव्याची रोपणी करण्याचा पर्याय निवडला आहे. कृषी खात्याच्या सहकार्याने कोलवाळ येथील ‘मॉडर्न कल्टिव्हेशन टेक्नॉलॉजी’तर्फे हा ट्रान्सप्लांटेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

कोसळधार पावसामुळे यंदा दोनवेळा शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी शेतीत लागवड केलेला तरवा खराब झाला आहे. खरीप शेतीचा अर्धाअधिक मोसम संपल्याने आता नव्याने तरवा रुजवून काढणे आणि त्याची रोपणी करेपर्यंत किमान बावीस दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

त्यातच आता बियाणेही मिळणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने ट्रान्सप्लांटेशनद्वारे शेती लागवडीचा पर्याय निवडला आहे. ट्रान्सप्लांटेशन म्हणजे तयार झालेल्या तरव्याची यंत्राद्वारे लागवड करण्यात येते. अशा पद्धतीने लागवड करण्यासाठी मनुष्यबळाची अर्थातच ‘कामेरी-मानाय’ यांची गरज भासत नाही.

Mayem Farmer Transplanting Project: ट्रान्सप्लांटेशन म्हणजे तयार झालेल्या तरव्याची यंत्राद्वारे लागवड करण्यात येते
Mayem News : ‘सिकेरी गोशाळे’मुळे भागात प्रदूषण वाढतेय; मये ग्रामसभेत दावा फेटाळला

शेतकऱ्यांसाठी वरदान

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया गेली. आता अवधी कमी असल्याने ट्रान्स्प्लांटेशनद्वारे शेतीत तरव्याची रोपणी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरणार असून, भविष्यात पडिक शेती लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे, असे मत सखाराम पेडणेकर आणि विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com