Sateri Kelbai Temple Ladfem | Nave Utsav  Dainik Gomantak
गोवा

Nave Utsav 2024: ..आता 'भातकापणीला' सुरवात! सातेरी केळबाई देवस्थानचा 'नवे उत्सव' उत्साहात साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Shri Sateri Kelbaii Devsthan Ladfe Nave Utsav 2024

डिचोली: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला लाडफे येथील सातेरी केळबाई देवस्थानचा पारंपरिक 'नवे उत्सव' शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदाचे मानकरी, देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ वाजतगाजत येथील देवाच्या शेतात गेले. शेतात भातपिकाची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर भाताची कणसे कापून ती वाजतगाजत मंदिरात आणली. ही कणसे परंपरेनुसार देवतांना अर्पण करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी कणसे आपापल्या घरी नेऊन घरोघरी विधिवत नवे केले.

या उत्सवात देवस्थान समिती तसेच नागरिक सहभागी झाले होते. देवदेवतांना भाताचे कणीस अर्पण करून 'नवे' उत्सव झाल्याने गावातील भात कापणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या नवे कार्यक्रमाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विष्णू मळीक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

Goa Travel Guide: गोव्यात आल्यावर प्रवासासाठी पर्याय काय? पर्यटकांनो जाणून घ्या

SCROLL FOR NEXT