Kerala Youth Found Dead In Goa Dainik Gomantak
गोवा

नैसर्गिक मृत्यू की हत्या? गोव्यात मृत झालेल्या मल्याळी तरुणाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या केरळमधील तरुणाचा वागातोर समुद्रकिनारी मृतदेह आढळून आला.

Pramod Yadav

Kerala Boy Death Mystery: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या केरळमधील तरुणाचा वागातोर समुद्रकिनारी मृतदेह आढळून आला.

19 वर्षीय संजयच्या मृतदेहाचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामुळे संजयचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या करण्यात आलीय याचे गूढ कायम राहिले आहे.

संजयच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या छातीच्या पुढच्या, मागच्या बाजूवर बल प्रयोग झाल्याचे ठळकपणे दिसून आले. मृत्यूपूर्वी त्याच्यावर हिंसक हल्ला झाल्याचे दिसते.

पण, अद्याप व्हिसेराचे रासायनिक विश्लेषण, सेरोलॉजिकल तपासणी आणि डायटॉम अभ्यासाचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक विभागाने मृत्यूचे निश्चित कारण सांगण्यास नकार दिला.

वैकत केरळ येथून संजय 29 डिसेंबर रोजी मित्रांसोबत गोव्यात आला होता, नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सेलिब्रेशननंतर संजय बेपत्ता झाला.

संजय बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी घरच्यांना दिली. संजच्या कुटुंबियांनी कुलशेखरमंगलम येथे पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार गोवा पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तो संजयचा असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संजयच्या घरच्यांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप केला असून याचा सखोल तपास करण्याची मागणी केलीय.

शवविच्छदेन केल्यानंतर गुरुवारी संजयचा मृतदेह त्याच्या मूळगावी कुलशेखरमंगलम येथे नेण्यात आला, शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT