Indian And Italy Navy Practice Indian Navy
गोवा

Italy and India Joint Naval Operation : चीनचे धाबे दणाणले! नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

Goa hosts Italy-India naval exercise: भारताने आयएनएस विक्रमादित्य आणि इटलीने आयटीएस केव्हर उतरवल्या होत्या, यासह दोन युद्धनौका देखील समुद्रात दाखल करण्यात आल्या होत्या.

Pramod Yadav

पणजी: नाटो सदस्य इटली आणि भारतीय नौदलाने सहा दिवस गोव्यातील समुद्रात पहिल्यांदा संयुक्त सराव केला. या ऐतिहासिक सरावात दोन्ही देशांनी विमानवाहू नौका समुद्रात उतरवल्या होत्या. भारतीय नौदलने सोशल मिडिया एक्सवर याबाबत माहिती दिली. ०१ ते ०६ ऑक्टोबरदरम्यान गोवा समुद्रात हा सराव पार पडला.

भारताने आयएनएस विक्रमादित्य आणि इटलीने आयटीएस केव्हर उतरवल्या होत्या, यासह दोन युद्धनौका देखील समुद्रात दाखल करण्यात आल्या होत्या.

०१ ऑक्टोबर रोजी दक्षिणपश्चिम समुद्रकिनाऱ्यावर इटलीची केव्हर नौका दाखल झाली. इटलीची भेट आंतरराष्ट्रीय आंतराळ सुरक्षा आणि समुद्रात मुक्त विहार सुनिश्चित करते, असे नवी दिल्ली येथील इटलीच्या दूतावासाने म्हटले आहे.

इटली आणि भारताच्या द्विपक्षीय सहकार्याच्या अजेंड्यामध्ये संरक्षण हे अग्रस्थानी आहे, असेही त्यात म्हटले आहे.

भारत आणि इटलीच्या नौदल दलांनी वाहक-आधारित लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह ऑपरेशन्स केले, यात एकत्रित मोठ्या सैन्याचा सहभाग, हवाई लढाऊ मोहिमा, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, शोध-आणि-बचाव मोहिमा, समन्वित शस्त्रे गोळीबार आणि संयुक्त युद्धाभ्यास यांचा समावेश होता.

भारतीय सागरात चीनची उपस्थिती वाढल्यानंतर भारतीय नौदल देखील सतर्क झाले आहे. याचाच भाग म्हणून इटलीसोबत पार पडलेला संयुक्त सराव. युरोप आणि आशियात जाण्यासाठी हा महत्वाचा सागरी मार्ग असल्याने मार्गावरील सुरक्षा भारताची जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT